इलॉन मस्क यांनी ट्विटर (Twitter) ताब्यात घेताच मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली. ब्लू टिक वापरकर्त्यांना प्रत्येक महिन्याला ८ डॉलर द्यावे लागणार असल्याची घोषणा केली होती, आता या निर्णयाची अंबलबजावणी करण्यात आली असून आता वापरकर्त्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. काही देशांसाठी सध्या हा निर्णय लागू करण्यात आला आहे.
ट्विटरने आजपासून ८ डॉलर रुपयांत ब्लू टिक व्हेरिफिकेशन सेवा सुरू केली. ही सेवा सध्या आयफोनसाठी उपलब्ध असून, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि ब्रिटन या देशांमध्ये सध्या हा निर्णय लागू करण्यात आला आहे.
"आजपासून आम्ही ट्विटर ब्लूमध्ये नवे फिचर देत आहोत." तुम्ही आता साइन अप केल्यास Twitter ब्लू दरमहा ७.९९ डॉलरमध्ये दिसेल. ट्विटरने काही नवीन फीचर्सची थोडक्यात माहिती दिली आहे, जी लवकरच व्हेरिफाईड अकाऊंट्ससाठी आणली जाईल, असंही ट्विटरने म्हटले आहे.
ट्विटरच्या कर्मचाऱ्यांच्या हकालपट्टीवर मस्क यांचं स्पष्टीकरण, म्हणाले...पर्यायच नव्हता!
"तुम्ही बॉट्सविरुद्धच्या लढाईत ट्विटरला पाठिंबा देत आहात, म्हणून आम्ही तुम्हाला अर्ध्या जाहिराती देऊ आणि त्या दुप्पट संबंधित बनवू." यात आता तुम्हाला मोठ्या वेळेचा व्हिडिओ पोस्ट करता येणार आहे, असंही ट्विटरने म्हटले आहे.
ट्विटरचे नवे मालक इलाॅन मस्क यांनी कंपनीतून माेठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. भारतातूनही बहुसंख्य कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. यावरून जाेरदार टीका हाेत आहे. मात्र, कंपनीला दरराेज लाखाे डाॅलर्सचा ताेटा हाेत असल्यामुळे पर्याय नव्हता, असे मस्क यांनी स्पष्ट केले आहे. मस्क यांनी ट्विट करून याबाबत कंपनीतील कर्मचारी कपातीबाबत भूमिका मांडली.
भारतात सुमारे २०० हून अधिक कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश जणांना घरी बसविले आहे. तसेच भारतातील कर्मचाऱ्यांना किती सेवरंस पॅकेज दिले, याबाबतही नेमकी माहिती दिलेली नाही.