शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

...म्हणून 22 नोव्हेंबरपासून ट्विटरवर दिसणार नाहीत राजकीय जाहिराती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 10:56 AM

ट्विटरने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ट्विटरवर आता राजकीय जाहिराती दिसणार नाहीत.

ठळक मुद्देट्विटरने सर्व प्रकारच्या राजकीय जाहिराती बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरचे सीईओ जॅक पॅट्रिक डॉर्सी यांनी याबाबत घोषणा केली आहे. 22 नोव्हेंबरपासून ट्विटरवर राजकीय जाहिराती दिसणार नाहीत.

नवी दिल्ली - मायक्रो ब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ट्विटर आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. मात्र आता ट्विटरने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ट्विटरवर आता राजकीय जाहिराती दिसणार नाहीत कारण ट्विटरने सर्व प्रकारच्या राजकीय जाहिराती बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरचे सीईओ जॅक पॅट्रिक डॉर्सी यांनी याबाबत घोषणा केली आहे. ट्वीट करून जॅक यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. 

जॅक यांनी 'आम्ही जगभरात सर्व राजकीय जाहिराती रोखण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय संदेश हा इतरांपर्यंत पोहोचवला पाहिजे पण तो विकत घेतला जाऊ नये असं आमचं मत आहे. का? तर काही कारणांसाठी...' असं ट्विट केलं आहे. 15 नोव्हेंबर रोजी याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. 22 नोव्हेंबरपासून ट्विटरवर राजकीय जाहिराती दिसणार नाहीत. हे लागू करण्याआधी जाहिरातदारांना नोटिस  देण्यात येणार आहे. 

'इंटरनेटवर जाहिराती खूप ताकदवान आणि प्रभावी ठरतात. व्यावसायिक जाहिरातींपर्यंत ठिक आहे, पण ही ताकद राजकीय जाहिरातींच्या बाबतीत मोठी जोखीम ठरू शकते. राजकारणामध्ये या जाहिरातींचा उपयोग मतांवर प्रभाव पाडण्यासाठी होऊ शकतो, याचा परिणाम लाखो लोकांच्या जीवनावर होण्याची शक्यता असते' असं देखील जॅक पॅट्रिक डॉर्सी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

ट्विटरवरील थ्रेड अचानक डिलीट झाल्यास ते थ्रेड का गायब झाले याचं स्पष्टीकरण ट्विटर देणार आहे. काही आठवड्यात हे फीचर युजर्सना दिसणार आहे. 'This tweet is unavailabe' च्या जागी ते ट्वीट का गायब झालं याचं कारण दिसणार आहे.  ट्विटरवर अनेकदा काही कन्व्हर्सेशनचे ट्वीट गायब झालेले दिसतात. त्यामुळे एखाद्या गोष्टीची जास्तीची माहिती मिळत नाही. ट्वीट गायब झाल्याने लोक गोंधळून जातात. त्यामुळेच ट्विटर आता युजर्सना ट्वीट का गायब झालं यामागचं कारण सांगणार आहे. प्रामुख्याने ट्वीट गायब झाल्यावर 'This tweet is unavailable' असं दाखवण्यात येतं. मात्र आता नवं फीचर रोलआऊट झाल्यावर गायब झाल्यामागचं नेमकं कारण आणि तपशील मिळणार आहे. 

खूशखबर! Twitter वर आता एडिट करता येणार ट्वीट; फायदेशीर ठरणार नवं फिचर

सोशल मीडियावर एखादी गोष्ट पोस्ट केल्यानंतर त्यामध्ये चूक असल्यास अथवा अन्य काही कारणांमुळे ती पोस्ट एडिट करायची असल्यास एडिटचा पर्याय उपलब्ध असतो. मात्र Twitter वर ट्वीट एडिट करता येत नाही. ट्वीटर युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण फेसबुकप्रमाणेच आता लवकरच ट्वीट एडिट करता येणार आहे. एडिटसाठी Twitter एक नवीन फीचर लॉन्च करणार आहे. ट्वीटरच्या या फीचरद्वारे युजर्सना एडिट केलेले ट्वीट दिसणार आहे मात्र याआधी केलेले मूळ ट्वीटही दिसणार आहे. ट्वीट एडिट करण्यासाठी आणण्यात येणाऱ्या नव्या फीचरचा युजर्सला फायदा होणार आहे. युजर्सकडे ते ट्वीट डिलीट करण्यासाठी 5 ते 30 सेकंदाचा वेळ असणार आहे. त्याच विंडोमध्ये युजर्स ते एडिट करू शकतात.

 

टॅग्स :Twitterट्विटरtechnologyतंत्रज्ञानPoliticsराजकारण