नवी दिल्ली - सोशल मीडिया सर्वांच्याच आयुष्याच एक अविभाज्य असा भाग झाला आहे. कुणासाठी केवळ टाइम पास करण्याचं साधन तर कुणासाठी प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी सोशल मीडियाचा वापर गरजेचं झाले आहे. आजच्या परिस्थितीत लोकं व्यवसाय, त्यासंदर्भातील बोलणीदेखील सोशल मीडियाच्याच माध्यमातून करताना पाहायला मिळतात. एवढंच नाही तर एखाद्याची खिल्ली उडवणं किंवा एखाद्याला उद्देशून अर्वाच्य भाषा वापरण्यासाठीदेखील सोशल मीडियाचा वापर केला जातो. एकूणच काय तर सर्व गोष्टींसाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो.
मात्र, ट्विटर आता एक अशी गोष्ट घेऊन येणार आहे, ज्यामुळे ट्रोलिंग करण्यावर कायमस्वरुपी आळा बसणार आहे. येत्या 18 डिसेंबरपासून ट्विटर वापरण्यासंदर्भात काही नवीन नियमांचा समावेश करण्यात येणार आहे. या नियमांमध्ये ट्रोलिंगसंदर्भातील देखील नियम आहेत.
...तर अकाऊंट होईल बंदअभद्र-अर्वाच्य भाषा आणि खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला तर तुमचे अकाऊंट बंद होईल. साधारणतः टीका करताना किंवा एखाद्याची मस्करी करताना अयोग्य भाषेचा वापर केल्याचं पाहायला मिळते. Twitter च्या नवीन हेटफूल कंडक्ट पॉलिसीनुसार, ट्विटरवर जर कुणी अर्वाच्य भाषा किंवा एखाद्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करत असेल, तर संबंधित व्यक्तीचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात येईल. येत्या 18 डिसेंबरपासून हा नियम लागू होणार आहे.
अकाऊंट बंद करण्यापूर्वी दिला जाणार इशारा जर कुणाकडून नियमांचं उल्लंघन करण्यात आले तर ट्विटरकडून सुरुवातीला युझरला संबंधित ट्विट डिलीट करण्याची सूचना देण्यात येईल. मात्र यानंतर पुन्हा नियमांचं उल्लंघन झालंच तर ट्विटरकडून अकाऊंट बंद केले जाईल. यानंतर युझर तोपर्यंत ट्विटरचा वापर करू शकत नाही जोपर्यंत ट्विटरकडून त्याचे अकाऊंट पुन्हा ओपन केले जात नाही. या गोष्टीही केल्यानंही बंद होऊ शकते अकाऊंट1. बौद्धिक संपत्तीची चोरी ( Intellectual Property )2. ग्राफिक्सच्या मदतीनं वापरलेलं अॅडल्ट कन्टेन्ट3. दुस-या युझरप्रमाणे युझर नेम ठेवण्याचा प्रयत्न 4. बोगस अकाऊंटद्वारे फसवणुकीचा प्रयत्न
आता तक्रार करण्याची गरज नाही, ट्विटर स्वतःहून घेणार अॅक्शनआतापर्यंत एखाद्या युझरनं खिल्ली उडवल्याप्रकरणी किंवा अभद्र भाषा वापरल्याप्रकरणी तक्रार केल्यानंतरच ट्विटरकडून कारवाई केली जात होती. मात्र 18 डिसेंबरपासून आक्षेपार्ह असे काही घडल्यास युझरच्या तक्रारीची वाट न पाहता ट्विट स्वतःहूनच संबंधितांविरोधात कारवाई करणार आहे.