इन्स्टाग्रामने दोन दिवसापूर्वी थ्रेड्स हे अॅप लाँच केले. या अॅपमुळे ट्विटरला मोठा धक्का बसला आहे,ट्विटरच्या ट्राफिकमध्ये ११ टक्क्यांची घसरण झाली आहे. यामुळे आता उद्योगपती इलॉन मस्क थ्रेड अॅपच्या प्रसिद्धीला घाबरले आहेत. आता ट्विटर आपल्या सर्च रिझल्ट पेजमधून थ्रेड्स अॅप लिंक ब्लॉक करत आहे. नुकतेच थ्रेड्सने अॅप डाऊनलोडमध्ये एआय चॅटबॉट चॅटजीपीटीला मागे टाकले आहे, आतापर्यंत १०० मिलियनपेक्षा जास्त वापरकर्त्यांनी थ्रेड डाऊनलोड केले आहे.
असला कसला इव्हेंट! Nothing Phone 2 मध्ये काहीच खास नाही; लोक म्हणताय, किंमत जरा अतीच...
थ्रेड्स अॅपवर अँडी बाओ नावाच्या युजरने ही माहिती दिली आहे. बाओ म्हणाले की 'url:threads.net' शोधून कोणतेही परिणाम मिळत नाहीत. तर Threads.net वेबसाइटची लिंक असलेले सर्व ट्विट परत केले पाहिजेत. ट्विटरने आपल्या प्रतिस्पर्धी अॅपच्या लिंक ब्लॉक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला, कंपनीने सबस्टॅक लिंक्सना ट्विटवर बंदी घातली होती, यामुळे अशा ट्विटला लाईक, रिट्विट किंवा प्रत्युत्तर देण्यापासून प्रतिबंधित केले.
थ्रेड्स हे अॅप ६ जुलै २०२३ रोजी लाँच झाले. या अॅपला आतापर्यंत १ बिलियन पेक्षा जास्त वापरकर्त्यांनी डाऊनलोड केले. एका अहवालानुसार, थ्रेड्समुळे ट्विटरला मोठे नुकसान झाले आहे. आता सोशल मीडियावर ट्विटर आणि मेटामध्ये मोठी स्पर्धा सुरू आहे. ट्विटरने मेटावर केस करण्याची धमकी दिली आहे. ट्विटरने थ्रेडवर कॉपी राइट आणि इटलॅक्चुअलचा चुकीचा वापर केला असल्याचा आरोप केला आहे.