शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

कमाल! आता Twitter वर व्हॉईस मेसेजही करता येणार; Voice DMs मुळे सहज संवाद साधता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 5:32 PM

Twitter Voice DMs Feature :प्रत्‍येक व्हॉईस मेसेज जवळपास 140 सेकंदांचा असू शकतो आणि चालता-फिरता किंवा अधिक प्रमाणात मेसेज टाइप करण्‍याची गरज असताना जलदपणे चॅटिंग करण्‍यामध्‍ये मदत करू शकतो.

नवी दिल्ली - देशामध्ये ट्विटरचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. लोकांना सुलभपणे संवाद करण्‍याची सुविधा देण्‍यासाठी ट्विटर डायरेक्‍ट मेसेजेसमधील (डीएम) व्हॉईस मेसेजेस् किंवा भारतातील व्हॉईस मेसेजेसची चाचणी करत आहे. हा प्रयोग भारतीयांसाठी टप्प्याटप्याने करण्‍यात येणार आहे. यामुळे ब्राझील व जपानसोबत ही सुविधा असणारा भारत हा पहिल्‍या तीन देशांपैकी एक आहे. 

ट्विटर इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक मनिष महेश्‍वरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''भारत ही ट्विटरसाठी प्राधान्‍य बाजारपेठ आहे. यामुळेच आम्‍ही सातत्‍याने नवीन वैशिष्‍ट्यांची चाचणी घेत आहोत आणि सेवेवरील लोकांच्‍या अनुभवांमधून माहिती मिळवत आहोत. आम्‍ही देशात डीएम प्रयोगामध्‍ये व्हॉईस मेसेजेस् सुविधा आणण्‍यासाठी आणि लोकांना व्यक्त करण्‍याचा नवीन मार्ग देत एखाद्या व्‍यक्‍तीचा आवाज ऐकत बारकावे, भावना व सहानुभूतीच्‍या माध्यमातून त्‍यांच्‍याशी संलग्‍न होण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी उत्‍सुक आहोत.'' 

प्रत्‍येक व्हॉईस मेसेज जवळपास 140 सेकंदांचा असू शकतो आणि चालता-फिरता किंवा अधिक प्रमाणात मेसेज टाइप करण्‍याची गरज असताना जलदपणे चॅटिंग करण्‍यामध्‍ये मदत करू शकतो. टेक्‍स्‍ट मेसेजच्‍या माध्‍यमातून अनेक गोष्‍टी सांगण्‍याच्‍या राहू शकतात किंवा त्‍यामध्‍ये अडथळा येऊ शकतो. ट्विटर येथील डायरेक्‍ट मेसेजेससाठी प्रॉडक्‍ट मॅनेजर अ‍ॅलेक्‍स अ‍ॅकरमन-ग्रीनबर्ग म्‍हणाले, ''आम्‍ही लोकांना सार्वजनिकरित्‍या व खासगीरित्‍या व्यक्त होण्यासाठी पर्याय देत आहोत. आम्‍ही आशा करतो की, लोकांना डीएमच्‍या माध्‍यमातून व्हॉईस मेसेजेस् रेकॉर्ड करण्‍यासोबत पाठवण्‍याची सुविधा दिल्‍याने उत्तम संवाद साधता येईल"

डीएममध्‍ये व्हॉईस मेसेज कसा पाठवावा? 

- हँड्स-फ्री अनुभवासाठी डीएम संवादामध्‍ये रेकॉर्डिंगला सुरुवात करण्‍याकरिता एकदाच नवीन व्हॉईस रेकॉर्डिंग आयकॉनवर टॅप करा. मेसेज बोलून झाल्‍यानंतर स्‍टॉप आयकॉनवर टॅप करा.

- तुम्‍हाला मेसेज पाठवण्‍यापूर्वी किंवा डिलीट करण्‍यापूर्वी रेकॉर्ड केलेला संदेश ऐकण्‍याचा पर्याय उपलब्‍ध होईल.

- आयओएसवर तुम्‍ही व्हॉईस रेकॉर्डिंग आयकॉन धरून राहत जलदपणे मेसेज पाठवू शकता आणि बोलून झाल्‍यानंतर त्‍वरित मेसेज पाठवण्‍यासाठी स्‍वाइप अप करू शकता. 

- कोणीही ट्विटरचा वापर केल्‍यानंतर हे मेसेज कुठेही ऐकू शकतील. पण, डीएमवर व्हॉईस मेसेजेस् रेकॉर्ड करण्‍याची सुविधा फक्‍त भारत, जपान व ब्राझीलमधील आयओएस व अँड्रॉईडचा वापर करणाऱ्या लोकांसाठी ट्विटरवर उपलब्‍ध असणार आहे. 

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

टॅग्स :Twitterट्विटरIndiaभारतtechnologyतंत्रज्ञान