मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर अलिकडे एक प्रॅंक वेगाने व्हायरल होत आहे. या प्रॅंकमध्ये यूजर्सना त्यांची जन्मतारीख बदलून २००७ करायला सांगितली जात आहे. आता ट्विटरने याच्याशी संबंधित सूचना जारी केली आहे. या सूचनेमध्ये सांगण्यात आलं आहे की, असं जर तुम्ही केल तर तुमचं अकाउंट लॉक होईल. त्यामुळे असं काही करू नका.
सोमवारी काही ट्विट्समध्ये असे लिहिण्यात आले होते की, जन्मतारीख बदलून २००७ केल्यावर यूजर्सचं फीड कलरफुल दिसायला लागेल. आणि यावर विश्वास ठेवून हजारो यूजर्सनी त्यांची जन्मतारीख बदलून २००७ केली. अशाच एका ट्विटला १८ हजार वेळा रिट्विट करण्यात आलं आहे आणि अनेक यूजर्स याच्या जाळ्यात अडकले आहेत.
ट्विटरवर १३ वर्षांपेक्षा कमी वयाचे यूजर्स अकाऊंट तयार करू शकत नाहीत. आता २०१९ वर्ष सुरू आहे आणि या प्रॅंकमधून जन्मतारीख बदलून २००७ करण्यास सांगितलं जातं आहे. त्यामुळे यूजर्सची जन्मतारीख बदलताच त्यांचं वय १२ वर्षे इतकं होतं आणि त्यांचं अकाउंट आपोआप लॉक होतं.
ट्विटकने या प्रॅंकशी निगडीत वॉर्निंग यूजर्सना दिली आहे आणि सांगितले की, यात अडकू नका किंवा यावर विश्वास ठेवू नका. ट्विटने लिहिले की, 'आम्हाला माहिती मिळाली आहे की, अनेक यूजर्स नवीन कलर स्कीम अनलॉक करण्यासाठी त्यांची जन्मतारीख बदलून २००७ करत आहेत. असं अजिबात करू नका'.
ट्विटरने लिहिले की, 'कृपया असं करू नका. तुम्ही १३ वर्षांपेक्षा कमी वयाचे असाल तर तुमचं अकाऊंट लॉक होईल'. ही समस्या गेल्यावर्षीही झाली होती. त्यामुळे ट्विटरने १३ वर्षांपेक्षा कमी वयाच्या यूजर्सचे अकाऊंट लॉक डाउन करणे सुरू केले होते. ट्विटरने हे पाऊस यूरोपियन यूनियन इंटरनेट प्रायव्हेसी लॉ शी संबंधित जनरल डेटा प्रोटेक्शन रेगुलेशननंतर उचललं होतं. ज्या यूजर्सचं अकाऊंट लॉक झाले आहेत, त्यांना पुन्हा रिक्वेस्ट करून एक फॉर्म भरण्यास सांगण्यात आलं आहे. त्यांचं अकाऊंट पुन्हा सुरू करण्यात येईल.
मात्र, ट्विटरने हे नाही सांगितलं की, या प्रॅंकची सुरूवात कुठून झाली आणि किती यूजर्सचे अकाऊंट यामुळे लॉक झाले आहेत. तसेच ट्विटरने हेही नाही सांगितले की, कोणत्या क्षेत्रातील यूजर्स सर्वात जास्त प्रभावित झाले आहेत. ट्विटरने सांगितले आहे की, ज्या यूजर्सचे अकाऊंट चुकून लॉक झाले आहेत, त्यांना त्यांच्या आयडी प्रूफची एक कॉपी ट्विटर सपोर्टसोबत संपर्क केल्यावर अपलोड करावी लागेल आणि त्यांचं अकाऊंट हे व्हेरिफाय केल्यावर पुन्हा सुरू करण्यात येईल.