Tesla, SpaceX आणि आता Twitterचे मालक Elon Musk यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. यात सर्वात मोठा निर्णय म्हणजे ब्लूटीकसाठी पैसे घेणे. सर्वांसाठीच हा निर्णय धक्कादायक आहे. यातच आता भारतीय युजर्सनीदेखील यासाठी तयार राहावे, असे मस्क यांनी म्हटले आहे.
ट्विटर प्रमुखाने एका यूजरच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले की, येत्या एका महिन्यात ट्विटर ब्लू भारतात येणार आहे. याचा अर्थ भारतातील सध्या असलेल्या ट्विटर यूजर्सना आता लवकरच ब्लूटीकसाठी $8 चे भरावे लागणार आहे. दरम्यान, मस्क यांचे भारतावर विशेष लक्ष का आहे? याचे उत्तर तुम्हाला आकडेवारीतून मिळेल. Statista.com च्या मते, अमेरिका आणि चीननंतर भारतात सर्वाधिक ट्विटर यूजर्स आहेत. आकडेवारीनुसार, भारतात ट्विटर वापरकर्त्यांची संख्या 23.6 मिलियन (2.36 कोटी) आहे.
भारतावर इलॉन यांचे विशेष लक्षदुसरीकडे, अमेरिकेत ट्विटरच्या वापरकर्त्यांची संख्या 7 कोटींच्या पुढे आहे, तर चीनमध्ये संख्या 5 कोटींच्या पुढे आहे. मस्क यांनी आपल्या ताज्या ट्विटमध्ये सूचित केले आहे की, भारत त्यांच्यासाठी मोठा बाजार आहे. म्हणूनच त्यांना भारतातदेखील लवकरात लवकर ब्लू टिक मॉडेल सुरू करायचे आहे.
मस्क यांना कमाईची घाई का ?2022 मध्ये आतापर्यंत मस्क यांचे $ 75 अब्जचे नुकसान झाले आहे. परदेशी मीडिया रिपोर्ट्सनुसार, मस्कने हा करार पूर्ण करण्यासाठी ट्विटरच्या नावावर $13 बिलियनचे कर्ज घेतले आहे. डील बुकच्या रिपोर्टनुसार, ट्विटरला या रकमेवर वार्षिक एक अब्ज व्याज द्यावे लागेल. ट्विटर आधीच तोट्यात चालले आहे, त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी मस्क वेगाने निर्णय घेत आहेत.