शाओमीच्या रेडमी ब्रँडने 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला फोन वनप्लसच्या आधीच लाँच केला होता. मात्र, अनेकांना वनप्लसची उत्सुकता होती. वनप्लसने दोन दिवसांपूर्वीच 48 मेगापिक्सलचा स्मार्टफोन लाँच केला खरा पण त्याची किंमत पन्नास हजारावर गेल्याने सामान्यांच्या आवाक्यात असलेला ब्रँड रेडमीने वनप्लसच्या ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी कंबर कसली आहे. रेडमी आणखी एक 48 मेगापिक्सलचा फोन लाँच करणार आहे. तर असूस झेनफोनचाही 48 मेगापिक्सलचा फोन आज लाँच होणार आहे.
Zenfone 6 मध्ये एकापेक्षा जास्त व्हेरिएन्टस आहेत. टॉपच्या व्हेरिअंटमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा असण्याची शक्यता आहे. याफोनमध्येही Sony IMX586 सेन्सर असणार आहे. तसेच 5000 एमएएच बॅटरी असेल. फुल एचडी प्लस डिस्प्ले, Android 9.0 Pie असणार आहे. तसेच 128 जीबीपासून 512 जीबी स्टोरेज स्पेस असणार आहे.
रेडमीने या फोनला 48MP कॅमेराच्या फोनने टॅग केले आहे. हा फोन 20 मे रोजी लाँच केला जाणार आहे.
Redmi Note 7S ला काही दिवसांतच बाजारात येणार असला तरीही त्याची रॅम, प्रोसेसर आणि डिझाईनबाबत अद्याप माहिती नाही.