स्वदेशी कंपनी U&i नं आपल्या ऑडिओ पोर्टफोलियोचा विस्तार केला आहे. कंपनीनं बॅटमॅन सीरीज, मिसाईल सीरीज, पिंक सीरीज आणि स्क्रू सीरीज भारतात सादर केली आहे. या प्रोडक्ट्सची किंमत अगदी परवडणारी आहे. परंतु यातील साउंड क्वॉलिटी आणि बॅटरी बॅकअप दमदार असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.
U&i ची बॅटमॅन सीरीजचे वायरलेस ईयरफोन 30 तासांचा बॅटरी बॅकअप देतात. यात कनेक्टिविटीसाठी ब्लूटुथ व्हर्जन 5.1+EDR देण्यात आलं आहे. या ईयरफोनमधील 40mAh ची बॅटरी 6 तासांचा टॉकटाइम देते. ईयरफोन आणि चार्जिंग केस 1.5 तासांत फुल चार्ज होतात. चार्जिंग केसमध्ये 350mAh ची बॅटरी आहे. U&i Batman सीरीजच्या वायरलेस ईयरफोनची किंमत रुपये 3,499 आहे.
U&i मिसाईल सीरीज टच सेन्सर आणि 20 तासांच्या बॅटरी बॅकअपसह सादर करण्यात आली आहे. याचा स्टॅन्डबाय टाइम 400 तास आहे. यात ब्लूटूथ 5.0+EDR ची कनेक्टिव्हिटी मिळते. हे ईयरफोन चार्जिंग केस विना 4 तासांचा टॉकटाइम देतात. U&i Missile सीरीजच्या वायरलेस ईयरफोनची किंमत रुपये 3,499 आहे.
U&i ची पिंक सीरीज ब्लूटुथ व्हर्जन 5.1 सह 2100 तासांचा स्टँडबाय टाइम देते. या नेकबँडचा टॉकटाइम आणि म्युजिक टाइम 25 तास आहे. U&i Pink सीरीजच्या वायरलेस नेकबँडची किंमत रुपये 2,499 आहे.
U&i ची स्क्रू सीरीज सर्वात स्वस्त सीरिज आहे. यात 24 तासांचा टॉकटाइम देणारे इयरफोन्स सादर करण्यात आले आहेत. यात ब्लूटुथ 5.0 ची कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. U&i च्या स्क्रू सीरीजच्या वायरलेस ईयरफोनची किंमत रुपये 799 आहे.
हे देखील वाचा:
नव्या वर्षात टेलिकॉम कंपन्या पुन्हा टॅरिफ वाढविणार; मोबाईलवर बोलणे महागणार
WhatsApp वर ग्रुप न बनवता 256 लोकांना एकसाथ द्या New Year च्या शुभेच्छा, वापरा सिक्रेट फिचर