Rugged Phone च्या कॅटेगरीमध्ये Ulefone Armor 14 नावाचा एक नवीन स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. हा फोन अवाढव्य बॅटरीला सपोर्ट करतो. AliExpress आणि Ulefone च्या वेबसाईटवरून हा Strong Phone विकत घेता येईल. या कामपीने मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि फास्ट तसेच वायरलेस चार्जिंग सपोर्ट दिला आहे.
Ulefone Armor 14 ची किंमत
Ulefone Armor 14 फोनची किंमत 199.99 डॉलर आहे. ही किंमत सुमारे 15,000 भारतीय रुपयांच्या आसपास रूपांतरित होते. लाँच ऑफर अंतर्गत AliExpress आणि Ulefone वर 27 ऑक्टोबरपर्यंत खास डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे हा फोन 159.99 डॉलर (अंदाजे ₹ 12,000) मध्ये विकत घेता येईल.
Ulefone Armor 14 चे स्पेसिफिकेशन्स
Ulefone Armor 14 या फोनमध्ये 6.52 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने याला मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसरची ताकद दिली आहे. तसेच यात 2GB RAM आणि 64GB स्टोरेज मिळते. हा डिवाइस Android 11 वर चालतो. हा एक वॉटर, डस्ट आणि शॉक प्रूफ फोन आहे, ज्यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देण्यात आले आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 20 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि एक डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. महत्वाचे म्हणजे या फोनमध्ये 10,000mAh ची अवाढव्य बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.