आयफोनमध्ये अँड्रॉइड अॅप्सचा वापर करता येईल यावर आपला विश्वास बसणार नाही. मात्र याच पध्दतीची सुविधा देणारे एक उपकरण आता भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आले आहे. आयफोनमध्ये आयओएस प्रणाली वापरण्यात येत असून अन्य बहुतांश स्मार्टफोन अँड्रॉइड प्रणालीवर चालणारे आहेत. जगात अन्य सिस्टीम्सदेखील प्रचलीत असल्या तरी स्मार्टफोनच्या वापरातील सर्वात मोठा वाटा अँड्रॉइड आणि आयओएस यांच्या विभागीत झालाय ही बाब उघड आहे. प्रत्येक ऑपरेटींग सिस्टीमची स्वत:ची खासियत आहे. याचा विचार करता या दोन्ही प्रणालींची बलस्थाने आणि कमकुवत दुवेदेखील आहेत. या पार्श्वभूमिवर, एकाच स्मार्टफोनमध्ये दोन्ही सिस्टीम वापरता आल्या तर...? असा विचार आपल्या मनात येऊ शकतो. असा कोणताही स्मार्टफोन सध्या तरी बाजारपेठेत उपलब्ध नसला तरी एका युक्तीचा वापर करून कुणीही युजरला दोन्ही प्रणालींचा वापर करणे शक्य आहे. या अनुषंगाने येर्हा.कॉम ( http://www.yerha.com/page/en/mesuit) या संकेतस्थळाने भारतीय बाजारपेठेत मेसुट या नावाने आयफोनची केस (आवरण) सादर केली असून यात नेमकी हीच सुविधा देण्यात आली आहे.
मेसुट या केसमध्ये आयफोनसाठी अतिरिक्त १,७५० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी, १६ जीबी स्टोअरेज आणि सेकंड सीमकार्ड टाकण्याची सुविधा देण्यात आली आहे. अर्थात या सर्व बाबी आयफोनच्या कार्यक्षमतेचा वाढ करणार्या आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे याच्या मदतीने आयफोनवर अँड्रॉइड प्रणालीचा वापर करता येणार आहे. एकदा ही केस आयफोनला (सध्या आयफोन ६ आणि आयफोन ६एस हे मॉडेल्स याच्याशी संलग्न करता येतील.) कनेक्ट केली की, आयफोनच्या डिस्प्लेवरील एका विशिष्ट आयकॉनवर क्लिक करताच आयओएसवरून अँड्रॉइड प्रणालीवर स्मार्टफोन शिफ्ट होईल. या केसमध्ये अँड्रॉइड प्रणालीवर आधारित मेसुट आयओएस १.० ही प्रणाली देण्यात आली आहे. याचा वापर करून गुगल प्ले स्टोअरवरून हवे ते अँड्रॉइड अॅप इन्टॉल करून वापरणे शक्य आहे. अर्थात याच्या जोडीला अजून एक सीमकार्ड मिळत असल्यामुळे एकाच आयफोनमध्ये दोन सीमकार्ड वापरण्यासह अतिरिक्त बॅटरी आणि वाढीव १६ जीबी स्टोअरेजच्या सुविधा (ज्या आयफोनमध्ये नाहीत !) मिळतात. हे मॉडेल येर्हा.कॉम या शॉपिंग पोर्टलवरून ९,९९० रूपये मूल्यात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे.
पहा : मेसुट केसची कार्यप्रणाली दर्शविणारा हा व्हिडीओ.