नवी दिल्ली - वापरण्यास सुलभ असल्याने गेल्या काही काळात व्हॉट्सअॅप लोकप्रिय ठरले आहे. व्हॉट्सअॅपवरील ग्रुपमधून अगदी गप्पांपासून ते ऑफीसमधील महत्त्वाच्या माहितीचीही देवाणघेवाण होत असते. अनेकांचे तर, व्हॉट्सअॅपशिवाय पानही हालत नाही. भारतामध्ये 50 मिलीयन पेक्षा आधिक लोत व्हॉट्सअॅपचा वापर करतात.
व्हॉट्सअॅप भारतात वापरत असेल्या सुमारे १० प्रादेशिक भाषांना सपोर्ट करते. यात मराठी, हिंदी, बंगाली, पंजाबी, तेलगू, तमिळ, उर्दू, गुजराती, कन्नड आणि मल्याळम या भाषांचा समावेश आहे. पण, इतक्या भाषांमध्ये उपलब्ध असूनही हे अॅप अनेकांना आपल्या भाषेत (स्थानिक) भाषेत वापरता येत नाही. तुम्हालाही व्हॉट्सअॅप स्थानिक भाषेत वापरताना अडचण येते का? या प्रश्नाचे उत्तर होय असेल तर, पुढील माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
व्हॉट्सअॅप उघडा, मेनू बटनवर टॅप करा
आता सेटींग्जमध्ये जा आणि अॅप लॅंग्वेज उघडा
आता पॉपअपमधून आपली आवडती आणि पसंतीची भाषा निवडा
महत्त्वाचे असे की, आपल्या स्मार्टफोनच्या क्षमतेनुसार त्यात मराठी, हिंदी बंगाली, पंजाबी, तेलगू, तमिळ, उर्दू, गुजराती, कन्नड आणि मल्याळम या भाषांचा समावेश असतो. दरम्यान, Whatsapp वापरकर्त्यांना एक सामान्य गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल ती अशी की, व्हॉट्सअॅप हे आपल्या फोनचीच भाषा फॉलो करते. जसे की, आपल्या फोनची भाषा जर मराठी असेल तर, व्हॉट्सअॅपही अॅटोमॅटीकली (स्वत:हून) मराठीत काम करेन. पण, अॅण्ड्रॉईड आणि आयओएसनुसार आपल्याला वेगवेगळी पद्धत अवलंबावी लागले.