मुंबई- व्हॉट्सअॅपने आणेललं नविन फीचर 'डिलिट फॉर एव्हरिवन' सगळ्यांनाच आवडलं आहे. एखाद्या चॅटमध्ये किंवा ग्रुपवर चुकीने पाठविलेला मेसेज डिलीट करणं आता शक्य होणार आहे. मेसेज पाठविल्यानंतर तो सात मिनीटांमध्ये डिलीट करता येतो. त्यामुळे जर तुम्ही चुकून एखादा मेसेज पाठविला असेल तर त्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही. पण व्हॉट्सअॅपच्या या नव्या फीचरमध्ये एका समस्या आहे. तुम्ही मेसेज डिलीट करू शकणार आहात पण तुमच्याकडून मेसेज सेंड झाल्याचं ज्या व्यक्तीला तुम्ही मेसेज केला आहे त्याला समजणार आहे.
चॅट बॉक्समध्ये किंवा ग्रुपवर पाठविलेला मेसेज जर तुम्ही डिलीट केला तरीही ज्या व्यक्तीला मेसेज केला त्याच्या चॅट बॉक्समध्ये 'This message was deleted' असा मेसेज जाईल इतकंच नाही, तर ज्या व्यक्तीला मेसेज केला आहे त्याचं चॅट लिस्टमध्ये सगळ्यात पहिलं दिसेल. त्यामुळे तुम्ही जो मेसेज केला आहे तोच तुम्ही डिलीट करू शकता. पण तुम्ही मेसेज पाठवून तो डिलीट केल्याचं समोरच्या व्यक्तीला समजणार आहे.
व्हॉट्सअॅपच्या या नव्या फीचरची सगळेच आतुरतेने वाट पाहत होते. ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ या फीचरमध्ये चुकून पाठवलेले मेसेज काही मिनिटांच्या आत युजर्सना रिकॉल करता येतो. तुम्ही पाठविलेला मेसेज जर डिलिट करायचा असेल तर त्या मेसेजवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तेथे तुम्हाला तीन पर्याय मिळतील. जर तुम्ही पहिला पर्याय निवडला तर तो मेसेज फक्त तुमच्या फोनमधून म्हणजेच तुमच्या पुरता डिलिट होईल. कॅन्सल निवडलं तर मेसेज डिलिट होणार नाही. पण जर डिलिट फॉर एव्हरिवन हा पर्याय निवडला तर तो मेसेज तुमच्या तसंच रिसिव्हरच्या चॅट बॉक्समधून डिलिट होईल.