नवी दिल्ली : रिलायन्स जिओची एन्ट्री झाल्यानंतर टेलिकॉम क्षेत्रातील स्पर्धा अधिक तीव्र झाली. यातच व्होडाफोन-आयडिया यांनी एकत्रित करार करून एकच कंपनी थाटल्याने या स्पर्धेत भरच पडली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक कंपनीकडून किफायतशीर प्लान आणले जात आहेत. कमी किमतीच्या प्लानमध्ये अधिकाधिक सुविधा देण्याचा कंपन्या प्रयत्न करीत आहेत. अशातच VI ने ४४९ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान आणला आहे.
VI च्या ४४९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये ५६ दिवसांची वैधता मिळते. तसेच VI कडून प्रतिदिन ४ जीबी देण्यात येतो. एवढेच नाही, तर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस, झी ५ अॅप आणि व्होडाफोन प्लेचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत देण्यात येते.
Jio चा विचार केल्यास, कंपनीकडून ४४४ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान ऑफर केला जातो. मात्र, जिओकडून केवळ २ जीबी डेटा प्रतिदिन दिला जातो. अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अॅपचे सबस्क्रिप्शन मिळते. जिओच्या या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे.
Airtel कडून ४४९ रुपये किमतीचा प्रीपेड रिचार्ज प्लान ऑफर केला जाते. एअरटेलकडूनही दररोज २ जीबी डेटा देण्यात येतो. यासह अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि अॅमेझॉन प्राईमचे ३० दिवसांसाठी मोबाइल एडिशन फ्री ट्रायल, फ्री हेलोट्यून्स, एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियम, विंक म्यूझिक फ्री, फ्री ऑनलाइन कोर्स, तसेच फास्टॅगवर १०० रुपयांचा कॅशबॅक मिळतो.
एकंदरीत या तिन्ही प्लानचा तुलनात्मक आढावा घेतल्यास तिन्ही कंपन्यांच्या प्लानची किंमत जवळपास सारखीच आहे. परंतु, यात VI च्या प्लानमध्ये रोज ४ जीबी डेटा मिळतो. तर Jio आणि Airtel प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. मात्र, अन्य सुविधांच्या बाबतीत एअरटेल पुढे असल्याचे दिसून येत आहे.