टेलिकॉम बाजारात टिकून राहण्यासाठी Vodafone Idea (Vi) सतत नवनवीन ऑफर्स घेऊन येत असते. आता वोडाफोन आयडियाने आपल्या हीरो अनलिमिटेड प्लॅन अंतगर्त एक नवीन कँपेन सुरु केली आहे. ज्या प्लॅन्सची किंमत 249 रुपयांपेक्षा जास्त आहे आणि त्या प्लॅन्समध्ये नवीन बेनिफिट्स जोडण्यात आले आहेत. यातील काही प्लॅन्ससह डबल डेटा बेनिफिट मिळेल, म्हणजे रोज 2+2 = 4GB डेटा मिळेल. या नवीन बदलांचा उद्देश GIGAnet 4G ग्राहकांना चांगले फायदे देण्याचा आहे आणि वि नेटवर्कवर नवीन ग्राहक आकर्षित करण्याचा आहे.
वोडाफोन आयडियाच्या 249 रुपयांपेक्षा जास्त किंमत असेलल्या रिचार्ज प्लॅन्समध्ये वीकेंड डेटा रोलओवर आणि नाइट टाइम फ्री डेटा असे फायदे आधीपासून मिळतात. आता 299 रुपये, 449 रुपये आणि 699 रुपयांच्या रिचार्जवर युजर्सना वीकेंड डेटा रोलओवर आणि नाइट टाइम फ्री डेटासोबत डबल डेटा बेनिफिट्स दिले जात आहेत. म्हणजे या प्लॅन्समधील रोज मिळणारा डेटा आता डबल होणार आहे.
वोडाफोन आयडियाने ऑक्टोबरमध्ये वीकेंड डेटा रोलओवर बेनिफिट्स सादर केले होते. या बेनिफिट्समध्ये सोमवार ते शुक्रवार दरम्यान तुम्ही न वापरलेला डेटा तुम्हाला शनिवार आणि रविवारी वापरता येतो. तसेच कंपनी रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता मोफत अमर्याद डेटा देते. यात आता कंपनीने डबल डेटा बेनिफिटची भर टाकून ग्राहकांचे फायदे दुप्पट केले आहेत.