शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Video: न बोलता कठीण प्रसंगी अंतराळवीर अवकाशात कसा संवाद साधतात? Nasa नं शेयर केला व्हिडीओ 

By सिद्धेश जाधव | Published: May 03, 2022 7:27 PM

Video: अंतराळवीर अवकाशात शब्दांविना कशाप्रकारे संवाद साधतात हे एका व्हिडीओमधून नासानं समजावून सांगितलं आहे.

अवकाशात सगळ्याच गोष्टी वेगळ्या असतात. त्यामुळे तिथं राहण्याची, खाण्याची, काम करण्याची, बोलण्याची आणि अगदी झोपण्याची पद्धत सुद्धा वेगळी असते. अंतराळवीर वेगवेगळे पद्धतींचा वापर करून या गोष्टी पृथ्वीबाहेर असलेल्या स्पेस स्टेशनमध्ये करत असतात. अंतराळात ध्वनी लहरींना प्रवास करण्यासाठी माध्यम नसतं म्हणून स्‍पेस मिशनमध्ये अंतराळवीर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी रेडियो सिस्‍टम आणि कम्‍युनिकेशन चॅनल्सच्या नेटवर्कचा वापर करतात. परंतु ही सेवा ठप्प झाली तर?  

आपत्कालीन परिस्थितीत रेडियो सिस्‍टम बंद झाल्यास किंवा मिशन गडबडल्यास किंवा स्‍पेस वॉक करताना अंतराळवीर एकमेकांशी कशाप्रकारे संवाद साधतात, याचा एक व्हिडीओ यूएस स्पेस एजन्सी NASA नं STEM या युट्युब चॅनेलवर शेयर केला आहे. हे युट्युब चॅनेल खासकरून विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्ये अवकाशात आकडे आणि हातवारे करून संवाद साधला जातो असं सांगण्यात आलं आहे. परंतु हे इशारे स्कुबा डायव्हर्स आणि पायलट देखील काहीशा अशा पद्धतींचा वापर करताना दिसतात.  

नासानं शेयर केलेला व्हिडीओ: 

नासानं शेयर केलेल्या व्हिडीओमध्ये अंतराळवीर राजा चारी आणि कायला बॅरोन दिसत आहेत. त्यांनी काही रंजक गोष्टी शब्दांविना कशाप्रकारे व्यक्त करता येतात हे दाखवलं आहे. इंटरनॅशनल स्‍पेस स्टेशनवर राहत आणि काम करताना ट्रेनिंगदरम्यान ते या गोष्टी शिकले आहेत. त्यानुसार, सगळं काही ठीक आहे की नाही हे विचारण्यासाठी आणि सांगण्यासाठी हाताने इशारा केला जातो. तसेच एकाच हाताने 1 ते 10  आणि त्यापुढील आकडे देखील कळवले जातात. या गोष्टी तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता.  

 
टॅग्स :NASAनासाtechnologyतंत्रज्ञान