Bluetooth Earphones: Vivo नं ऑडिओ अॅक्सेसरीज सेगमेंटमध्ये पदार्पण केले आहे. याची सुरुवात कंपनीनं भारतात एक नवीन नेकबँड इयरफोन लाँच करून केली आहे. ज्यांचं नाव Vivo Wireless Sport Lite आहे. हे इयरफोन्स बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आले आहेत. यात नॉइज कॅन्सलेशन, वॉटर रेजिस्टन्स आणि 18 तासांचा प्लेबॅक टाइम मिळतो.
Vivo Wireless Sport Lite ची किंमत
विवोच्या नव्या ब्लूटूथ नेकबँडची किंमत 1,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ये इयरफोन्स ब्लु आणि ब्लॅक अशा दोन कलर व्हेरिएंटसह बाजारात उपलब्ध होतील. ऑफलाईन रिटेल स्टोर्स आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून हे विकत घेता येतील.
Vivo Wireless Sport Lite
Vivo Wireless Sport Lite नेकबँडमध्ये 80ms पर्यंतचा लो लेटेंसी रेट मिळतो, यामुळे गेमिंग करताना दृश्य आणि आवाजात जास्त अंतर राहत नाही. विवोच्या या नेकबँडमध्ये अॅल्युमिनियम कोटेड ब्रॉन्ज कॉइलचा वापर करण्यात आला आहे. तसेच यात कस्टमाइज्ड 11.2mm सिंगल ड्रायव्हर यूनिट देण्यात आला आहे.
या डिवाइसमध्ये कॉल नॉइज कॅन्सलेशन फीचर मिळते, त्यामुळे कॉलवर चांगली ऑडिओ क्वॉलिटी मिळते. विवो नेकबँडमध्ये ब्लूटूथ v5.0, IPX4 वॉटर रेजिस्टन्स मिळतो. तसेच सिंगल चार्जवर हे इयरफोन्स 18 तासांचा प्लेबॅक टाइम देऊ शकतात. परंतु तुम्ही हे फक्त 10 मिनिटं चार्ज करून 5 तासांचा प्लेबॅक टाइम मिळवू शकता.
हे देखील वाचा:
4 हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह Realme चे स्मार्टफोन्स उपलब्ध; फ्लॅगशिप फोन देखील झाले स्वस्त
सावधान! अँड्रॉईड फोनवर या 8 चुका करत असाल तर, घोटाळेबाजांना तुम्हीच मदत करताय