Vivo नं आपला सर्वात पहिला अँड्रॉइड टॅबलेट काल चीनमध्ये सादर केला आहे. बहुप्रतीक्षित Vivo Pad नं 8GB RAM, 8040mAh बॅटरी, 11 इंचाचा डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि ड्युअल कॅमेऱ्यासह एंट्री घेतली आहे. विशेष म्हणजे यात क्वॉलकॉमच्या Snapdragon 8 सीरिजचा प्रोसेसर मिळतो. तसेच यात कंपनीनं stylus सपोर्ट देखील दिला आहे.
Vivo Pad चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Pad मध्ये 11 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 2.5K पिक्सल रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. टॅबलेट Qualcomm Snapdragon 870 प्रोसेसरसह येतो. त्याचबरोबर 8GB RAM आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Vivo Pad टॅबलेट Android 11 OS वर चालतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या टॅबलेटमध्ये Dolby सिस्टम असलेले क्वॉड स्पिकर देण्यात आले आहेत.
विवो टॅबलेटच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यात 13MP चा मुख्य कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आहे. तर फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. यात 44W फास्ट चार्जिंगसह 8040mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
Vivo Pad ची किंमत
हा टॅबलेट चीनमध्ये ब्लू, ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. याच्या 8GB RAM व 128 GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 2,499 युआन (जवळपास 29700 रुपये) आहे. तर 8GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज असलेला मॉडेल 35700 रुपयांमध्ये विकला जाईल.