Vivo ने एप्रिलमध्ये आपल्या एस9 सीरीजमध्ये दोन स्मार्टफोन लाँच केले होते. या सीरिजमध्ये Vivo S9 5G आणि Vivo S9e सादर केल्यानंतर आता कंपनी Vivo S10 लाँच करण्याची तयारी करत आहे. रुमर्सनुसार S10 सर्वप्रथम चीनमध्ये लाँच केला जाईल, हा फोन जुलैमध्ये सादर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी विवो एस10 चे केस रेंडर्स समोर आल्यानंतर आता एका वीबो पोस्टच्या माध्यमातून Vivo S10 ची माहिती लीक झाली आहे.
Vivo S10 ची माहिती
चीनी सोशल मीडिया साइट वीबोवर Vivo S10 ची माहिती लीक झाली आहे. या माहितीनुसार Vivo S10 मध्ये Dimensity 1100 चिपसेट असेल. तसेच या फोनमध्ये 8GB आणि 12 GB रॅम सोबत 4GB वर्चुअल रॅम देण्यात येईल. फोनमध्ये Android 11 आधारित OriginOS UI असेल.
Vivo S10 मध्ये 44W रॅपिड चार्जिंग टेक्नॉलॉजी असेल जी फक्त 15 मिनिटांत हा फोन 38 टक्क्यांपर्यंत चार्ज करू शकते. या फोनमध्ये एनएफसी सपोर्ट देखील मिळेल. Vivo S10 ची सर्वात मोठी खासियत म्हणजे 108-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा. या विवोस्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल.
सिरीजमधील जुन्या Vivo S9 चे स्पेसिफिकेशन्स
Vivo S9 मध्ये 6.44-इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये Dimensity 1100 एसओसी देण्यात आली आहे. यात 12GB पर्यंतचा रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे.
Vivo S9 मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64MP चा मुख्य सेन्सर, 8MP अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. या फोनमध्ये दोन सेल्फी कॅमेरे आहेत, ज्यात 44MP चा प्रायमरी सेन्सर आणि 8MP चा अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. 4,000mAh ची बॅटरी या फोनला पावर देते, ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.