VIVO पुढील आठवड्यात चीनमध्ये एका लाँच इव्हेंटचे आयोजन करणार आहे. या इव्हेंटच्या माध्यमातून कंपनीची बहुप्रतीक्षित Vivo X70 series ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. आता अशी बातमी आली आहे कि या इव्हेंटमध्ये कंपनी Vivo S10e स्मार्टफोन देखील सादर करणार आहे. हा फोन ने जुलैमध्ये सादर झालेल्या ‘एस10’ सीरीजमधील Vivo S10 आणि Vivo S10 Pro नंतरचा तिसरा स्मार्टफोन असेल.
विवोने चीनमध्ये 9 सप्टेंबरला एका इव्हेंटचे आयोजन केले होते. आता हा इव्हेंट पुढे ढकलण्यात आला आहे. 13 सप्टेंबरला होणाऱ्या लाँच इव्हेंटच्या माध्यमातून फ्लॅगशिप Vivo X70 सीरीज सोबत एस10ई देखील सादर केला जाऊ शकतो. कंपनीने या स्मार्टफोनबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार 13 सप्टेंबरला Vivo S10e बाजारात दाखल होईल.
Vivo S10e चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
विवो एस10ई मध्ये 6.44 इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. हा डिस्प्ले 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. या फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी ऑक्टकोर प्रोसेसरसह मीडियाटेक डायमनसिटी 900 चिपसेट दिला जाऊ शकतो. या चिपसेटला 12GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेजची जोड देण्यात येईल. हा विवो फोन अँड्रॉइड 11 ओएसवर लाँच केला जाईल.
Vivo S10e मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असेल, जुलै 8 मेगापिक्सलच्या सेकंडरी लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सरची सोबत मिळेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. विवो एस10ई मधील बॅटरीची क्षमता समजली नाही परंतु हा फोन 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल.