शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

शानदार लूक आणि स्पेक्ससह येतोय Vivo S10e; वेबसाईटवर लिस्ट झाला आगामी Vivo Phone 

By सिद्धेश जाधव | Published: October 16, 2021 5:08 PM

Vivo Phone Vivo S10e Launch, Price, Specification:

विवो सतत नवनवीन फोन सादर करत असते. कंपनीच्या स्मार्टफोनच्या लूक आणि डिजाईनची नेहमीच चर्चा केली जाते. आता असाच एक शानदार फोन चीनमध्ये S-series अंतर्गत लाँच केला जाणार आहे. Vivo S10 आणि S10 Pro लाँच केल्यांनतर आता कंपनी “e” व्हेरिएंटवर काम करत आहे. Vivo S10e स्मार्टफोन सर्टिफिकेशन साईट TENAA वर मॉडेल नंबर V2130A सह लिस्ट करण्यात आला आहे. विवोच्या होम मार्केटमध्ये सादर झाल्यानंतर हा फोन भारतीय बाजारपेठेत देखील दिसू शकतो.  

Vivo S10e चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo S10e स्मार्टफोन फोन चीनमध्ये यावर्षीच्या शेवटी सादर केला जाऊ शकतो. मीडिया रिपोर्टनुसार हा फोन आयताकृती रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात येईल. यात कंपनी तीन कॅमेरा सेन्सर आणि एलईडी फ्लॅश देऊ शकते. हा विवो फोन ब्लॅक, व्हाइट आणि पिंक कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाईल. फोनच्या फ्रंट पॅनलवर वॉटर ड्रॉप नॉच दिली जाऊ शकते.  

TENAA च्या लिस्टिंगनुसार हा फोन 6.44-इंचाचा Full HD+ डिस्प्लेला सपोर्ट करेल. हा AMOLED डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz असेल. Vivo S10e स्मार्टफोन MediaTek Dimensity 900 SoC सह बाजारात येईल. 

फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64MP Samsung GW2 चा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा दिला जाईल. या फोनमध्ये 32MP Sony IMX615 सेन्सर फ्रंट कॅमेरा म्हणून देण्यात येईल. तसेच या फोनमध्ये 4000mAh ची बॅटरी मिळेल. ही बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.  

Vivo S10e ची किंमत  

Vivo S10e हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर केले जाऊ शकतात. जे 8GB RAM + 128GB आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज अशा दोन ऑप्शनसह सादर केला जाऊ शकतो. यातील छोट्या व्हेरिएंटची किंमत 2,499 युआन (सुमारे ₹29,250 रुपये), तर मोठा मॉडेल 2,799 युआन (सुमारे ₹ 32,750) आहे.  

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान