विवोने आपल्या होममार्केट चीनमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Vivo S10 आणि S10 Pro या दोन फोन्स नंतर कंपंनीने एस सीरिजमध्ये Vivo S10e नावाचा फोन सादर केला आहे. हा फोन White Gradient, Haze Blue आणि Glaze Black कलरमध्ये चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनच्या भारतीय लाँचची माहिती मात्र अजूनही समोर आलेली नाही.
Vivo S10e चे स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये 6.44-इंचाचा Full HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा AMOLED डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह सादर करण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी कंपनीने MediaTek’s Dimensity 900 चिपसेटचा वापर केला आहे. त्याला 8GB RAM आणि 128GB व 256GB स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. हा डिवाइस अँड्रॉइड 11 आधारित ओरिजिनओएस वर चालतो.
Vivo S10e मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात प्रायमरी कॅमेरा 64MP Samsung GW2 सेन्सर, त्याचबरोबर 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनच्या फ्रंटला 32MP Sony IMX615 सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
Vivo S10e ची किंमत
Vivo S10e चे दोन व्हेरिएंट चीनमध्ये आले आहेत. यातील 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 2,399 युआन (अंदाजे ₹ 28,200) आहे. तर 8GB RAM आणि 256GB मॉडेलची किंमत 2,599 युआन (अंदाजे ₹ 30,400) आहे.