Vivo S15 आणि Vivo S15 Pro स्मार्टफोनच्या चीनमधील लाँचची माहिती कंपनीनं आधीच दिली आहे. चीनमध्ये 19 मेला विवो एस 15 सीरीज लाँच केली जाईल. परंतु या दिवशी फक्त दोन स्मार्टफोन बाजारात येणार नाहीत तर अन्य विवो प्रोडक्ट्स देखील सादर केले जातील. ज्यात Vivo Air TWS इयरबड्स, Vivo Pad टॅबलेट आणि Vivo Watch 2 स्मार्टवॉच देखील लाँच केले जाऊ शकतात.
पहिल्यांदाच Vivo आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो इतका वाढवणार असल्याचं दिसत आहे. आतापर्यंत फक्त स्मार्टफोन सेगमेंटमध्ये कार्यरत असलेली कंपनी आता ऑडिओ अॅक्सेसरीज, टॅबलेट आणि स्मार्टवॉच सेगमेंटचा विस्तार करणार आहे. यातील काही डिवाइसची माहिती याआधी लीक देखील झाली आहे.
Vivo S15 आणि Vivo S15 Pro चे स्पेसिफिकेशन्स
मीडिया रिपोर्टनुसार, Vivo S15 स्मार्टफोनमध्ये 6.62-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यात 12GB पर्यंतचा रॅम आणि 512GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. विवोच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर मिळू शकतो.
Vivo S15 Pro स्मार्टफोन MediaTek Dimensity 8100 SoC सह प्रोसेसरसह येईल. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळू शकते. मागे असलेल्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. त्याचबरोबर 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेन्सर मिळेल.