Vivo नं चीनमध्ये दोन नवीन स्मार्टफोन Vivo S15 Pro आणि Vivo S15 लाँच केले आहेत. यातील प्रो मॉडेलमध्ये MediaTek Dimensity 8100 प्रोसेसरसह 4500mAh ची बॅटरी आणि 80W फास्ट चार्ज देण्यात आला आहे. तर Vivo S15 स्मार्टफोन Snapdragon 870 प्रोसेसर, 4500mAh बॅटरी 66W फ्लॅशसह बाजारात येतो.
Vivo S15 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Vivo S15 Pro स्मार्टफोनमध्ये 6.56-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनला MediaTek Dimensity 8100 प्रोसेसरची पावर मिळते. सोबत LPDDR5 RAM आणि वेगवान UFS3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. यातील 4,500mAh ची बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मागे असलेल्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 50MP चा मुख्य, 12MP चा अल्ट्रा वाईड आणि 2MP चा पोर्टेट कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 32MP चा सेन्सर मिळतो. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, अँड्रॉइड 12 वर आधारित OriginOS Ocean आणि बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत.
Vivo S15 चे स्पेसिफिकेशन्स
Vivo S15 स्मार्टफोनमध्ये 6.62-इंचाचा फुल एचडी+ 120Hz रिफ्रेश रेट असलेला AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन Snapdragon 870 SoC सह LPDDR4X RAM आणि UFS3.1 स्टोरेजसह विकत घेता येईल. हा फोन अँड्रॉइड 12 वर चालतो. या फोनमधील 4400mAh ची बॅटरी 66W फ्लॅश चार्जला सपोर्ट करते. फोनच्या मागे 64MP चा प्रायमरी, 8MP अल्ट्रा वाईड आणि 2MP मॅक्रो कॅमेरा सेन्सर असलेला कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी कॅमेऱ्यासाठी 32MP चा सेन्सर आहे. अन्य स्पेसिफिकेशन्स Vivo S15 Pro सारखेच आहेत.
किंमत
- Vivo S15 Pro 8GB/256GB: 3399 युआन (सुमारे 39,100 रुपये)
- Vivo S15 Pro 12GB/256GB: 3699 युआन (सुमारे 42,600 रुपये)
- Vivo S15 8GB/128GB: 2699 युआन (सुमारे 31,100 रुपये)
- Vivo S15 8GB/256GB: 2999 युआन (सुमारे 34,500 रुपये)
- Vivo S15 12GB/256GB: 3299 युआन (सुमारे 38,000 रुपये)
हे फोन्स लवकरच भारतात देखील दाखल होऊ शकतात.