Vivo इंडिया भारतातील आपली ‘वाय’ सीरिज बंद करण्याचं निर्णय घेऊ शकते. ही कंपनीची बजेट सेगमेंटमधील सीरिज आहे. ही सीरिज येत्या मार्चपासून देशातून गायब होण्यास सुरुवात होऊ शकते. कारण तेव्हा या सीरिजला रिप्लेस करण्यासाठी विवो ‘टी’ सीरिज भारतात येईल. कंपनीनं या सीरिजचे दोन स्मार्टफोन आधीच चीनमध्ये सादर केले आहेत.
गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये कंपनीनं Vivo ‘T’ Series मध्ये Vivo T1 आणि Vivo T1x हे दोन शानदार स्मार्टफोन सादर केले आहेत. हे फोन्स सध्या फक्त चीनमध्ये उपलब्ध आहेत. परंतु यंदा हे हँडसेट भारतात येतील. भारतात ही स्मार्टफोन सीरीज Vivo ‘Y’ Series च्या स्मार्टफोन्सची जागा घेईल, अशी माहिती 91मोबाईल्सनं टिपस्टर मुकुल शर्माच्या हवाल्याने दिली आहे. येत्या मार्चमध्ये भारतात नवीन Vivo T1 स्मार्टफोन सादर केला जाईल, जो एक 5G Phone असेल. विवोनं मात्र याची अधिकृत माहिती दिलेली नाही.
Vivo T1 5G चे स्पेसिफिकेशन्स
विवो टी1 5जी स्मार्टफोन 6.57 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 240hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. एक एलसीडी डिस्प्ले आहे. प्रोसेसिंगसाठी कंपनीने यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 ओएसवर चालतो. यात 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी Vivo T1 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.
हे देखील वाचा:
Flipkart Sale: इतक्या स्वस्तात मिळतोय iPhone 12; फक्त काही दिवस मिळणार अशी भन्नाट ऑफर