शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
3
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
4
"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; जो बायडेन यांनी केलं कौतुक
5
"जिवंत राहिले तर आवश्य कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
6
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
7
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
8
ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला!
9
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
10
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
11
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
12
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
13
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
14
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
15
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
16
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
17
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
18
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
19
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
20
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही

शाओमी-रियलमीची चिंता वाढली; 44W फास्ट चार्जिंगसह Vivo T1 ची भारतात एंट्री; इतकी आहे किंमत 

By सिद्धेश जाधव | Published: May 04, 2022 3:58 PM

Vivo T1 स्मार्टफोन 8GB RAM, 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंगसह भारतात आला आहे.

विवोनं आज भारतात दोन शानदार स्मार्टफोन सादर केले आहेत. आकर्षक डिजाईन आणि दमदार स्पेक्ससह Vivo T1 आणि Vivo T1 Pro ची एंट्री भारतात झाली आहे. इथे आपण Vivo T1 विषयी जाणून घेणार आहोत. याआधी आलेल्या Vivo T1 5G चा हा 4G व्हर्जन आहे. यात 8GB RAM, 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंग मिळते.  

Vivo T1 44W ची किंमत 

हा स्मार्टफोन तीन व्हेरिएंट्समध्ये भारतात विकत घेता येईल. यातील 4 जीबी रॅम व 128 जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत 14,499 रुपये आहे. तर 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज मिळवण्यासाठी 16,999 रुपये द्यावेत लागतील. Vivo T1 44W च्या 8 जीबी रॅम  व 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली आहे. विवो टी1 स्मार्टफोन Midnight Galaxy, Starry Sky आणि Ice Dawn कलरमध्ये लाँच झाला आहे. हा फोन 8 मेपासून विकत घेता येईल.  

Vivo T1 चे स्पेसिफिकेशन्स 

विवो टी1 मध्ये 6.44 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या वॉटर ड्रॉप डिजाईनसह येतो आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 408पीपीआय डेन्सिटी आणि डीसीआय-पी3 कलर गामुटला सपोर्ट करतो. नवा अँड्रॉइड 12 डिवाइस फनटचओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 4GB एक्सटेंडेड रॅम मुळे एकूण 12GB ची ताकद मिळते.  

कॅमेरा सेगमेंट पाहता, विवो टी1 स्मार्टफोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा मिळतो. फ्रंटला 16 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टव्हिटी फीचर्ससह इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. यातील 5,000एमएएच बॅटरी 44वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

 
टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइल