Vivo ची नवीन ‘T’ Series भारतात येणार अशी माहिती काही दिवसांपूर्वी आली होती. आता त्या बातमीला दुजोरा देत विवो इंडियानं सोशल मीडियावरून नव्या स्मार्टफोनच्या लाँचची घोषणा केली आहे. त्यानुसार येत्या 9 फेब्रुवारीला Vivo T1 5G Phone भारत लाँच केला आहे. कंपनीच्या या आगामी स्मार्टफोनची किंमत किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.
हा फोन फ्लिपकार्टवरून विकला जाईल, असं देखील कंपनीनं सांगितलं आहे. हा 5G Phone भारतात Qualcomm Snapdragon 695 चिपसेटसह सादर केला जाईल, असं देखील रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. परंतु चीनमध्ये आलेल्या विवो टी1 मधील प्रोसेसर वेगळा आहे.
Vivo T1 5G चे स्पेसिफिकेशन्स
चीनमध्ये आलेल्या विवो टी1 5जी फोनमध्ये 6.57 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 240hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. एक एलसीडी डिस्प्ले आहे. प्रोसेसिंगसाठी कंपनीने यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 ओएसवर चालतो. यात 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी Vivo T1 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.
हे देखील वाचा:
5000mAh बॅटरीसह आला दमदार स्मार्टफोन; स्वस्तात 90हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला स्मूद डिस्प्ले
स्मार्टफोनला कव्हर वापरताय? त्याचे तोटेही अनेक आहेत, समजल्यावर काढून टाकाल...