Vivo नं या महिन्यात आपल्या नव्या टी सीरिजची सुरुवात केली आहे. कंपनीनं Vivo T1 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. सीरिजमध्ये Vivo T1X देखील याआधी चीनमध्ये लाँच झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी या स्मार्टफोन सीरीजमध्ये अजून एक डिवाइस Vivo T1 Pro 5G नावानं जोडणार आहे. सर्वप्रथम चीनमध्ये लाँच झाल्यानंतर हा फोन भारतीयांच्या भेटीला येईल.
MySmartPrice च्या रिपोर्टनुसार, Vivo T1 Pro 5G स्मार्टफोन भारतात एप्रिल आणि मे दरम्यान लाँच केला जाऊ शकतो. या डिवाइसचे चीनमध्ये मिळणारे स्पेक्स आणि भारतीय स्पेक्स वेगळे असू शकतात. तसेच विवोचा हा Vivo T1 Pro 5G स्मार्टफोन या सीरीजच्या Vivo T1 5G स्मार्टफोनच्या तुलनेत अपग्रेडेड स्पेसिफिकेशन्ससह सादर केला जाईल. सध्या तरी या स्मार्टफोनची जास्त माहिती उपलब्ध झाली नाही.
Vivo T1 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
Vivo T1 5G मध्ये 6.58-इंचाची फुल एचडी+ एलसीडी स्क्रीन देण्यात येईल. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनला क्वॉलकॉमच्या Snapdragon 695 चिपसेटची प्रोसेसिंग पावर देण्यात आली आहे. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएसवर चालतो.
फोटोग्राफीसाठी Vivo T1 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. सिक्योरिटीसाठी साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. Vivo T1 मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
हे देखील वाचा: