Vivo कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच टॅबलेट लाँच केला जाणार आहे. याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गेल्याच वर्षी दिली होती. हा टॅबलेट 2022 च्या पूर्वार्धात पहिला Vivo Tablet बाजारात येईल, असं देखील सांगण्यात आलं होतं. आता या डिवाइसचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. त्यांवर Vivo Tablet मध्ये 44W fast charging, 7,860mAh battery आणि 120Hz refresh rate आणि Qualcomm Snapdragon 870 चिपसेट मिळेल.
Vivo Tablet चे लीक स्पेसिफिकेशन्स
लीकमधून आगामी विवो टॅबलेटचे काही महत्वाचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. या टॅबलेटला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 870 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात येईल. जो Xiaomi Pad 5 Pro मध्ये देखील मिळाला होता. त्यामुळे हा टॅब शाओमीला चांगली टक्कर देऊ शकतो. या टॅबलेटमध्ये लेटेस्ट अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टम आधारित ओरिजनओएस मिळेल.
Vivo Tablet मध्ये पंच-होल डिजाईन असलेला मोठा डिस्प्ले मिळेल. या डिस्प्लेचा आकार किती असेल ते समजले नाही परंतु यात फुलएचडी+ रिजोल्यूशन मिळेल. लीकनुसार हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. तसेच पॉवर बॅकअपसाठी विवो टॅबलेटमध्ये 7,860एमएएचची मोठी बॅटरी मिळू शकते. ही बॅटरी 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केली जाऊ शकते. टिपस्टर डिजीटल चॅट स्टेशननुसार, हा डिवाइस सर्वप्रथम चीनमध्ये सादर केला जाईल. त्यानंतर जगभरातील बाजारतपेठांमध्ये विवो टॅबलेट उपलब्ध होईल.
हे देखील वाचा:
108MP कॅमेरा, मिनिटांत चार्ज होणारा Xiaomi 11T Pro 5G लाँच; पहिल्याच सेलमध्ये मिळवा हजारोंची सूट