विवोने आपला नवीन स्मार्टफोन Vivo V21 5G Neon Spark भारतात लाँच केला आहे. हा याआधी सादर झालेल्या Vivo V21 5G चा नवीन कलर व्हेरिएंट आहे. जो याआधी आर्टिक व्हाइट, डस्क ब्लू आणि सनसेट डॅजल कलरमध्ये उपलब्ध होता. आता हा फोन Neon Spark या नवीन कलरमध्ये विकत घेता येतील. रंगाव्यतिरिक्त या फोनच्या इतर कोण्याही स्पेसिफिकेशनमध्ये बदल करण्यात आला नाही.
Vivo V21 5G ची किंमत
Vivo V21 5G स्मार्टफोन 8+3GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 29,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर या फोनचा 256GB वेरिएंट 32,990 रुपयांमध्ये विकत घेता येतो. नवीन कलर व्हेरिएंट देखील याच किंमतीत उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. हा स्मार्टफोन विवो इंडिया ऑनलाइन स्टोर आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वरून विकत घेता येईल. तसेच या फोनच्या खरेदीवर 2500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. सोबत कंपनी वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट आणि जियो ऑफर देखील देत आहे.
Vivo V21 5G Neon Spark चे स्पेसिफिकेशन्स
Vivo V21 5G मध्ये 6.44 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आणि रिजोल्यूशन 1080p आहे आहे. कंपनीने यात MediaTek Dimensity 800U प्रोसेसर दिला आहे. हा स्मार्टफोन 11GB पर्यंतच्या रॅमसह सादर करण्यात आला आहे, ज्यात 8GB RAM आणि 3GB एक्सटेंड RAM मिळतो. फोनमध्ये 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. हा फोन Android 11 आधारित Funtouch OS 11.1 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी 33W फ्लॅश चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.
Vivo V21 5G स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर LED फ्लॅशसह 64MP OIS सेन्सर, 8MP चा अल्ट्रा वाइड सेन्सर आणि 2 MP चा मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 44 MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. जो OIS आणि डुअल LED फ्रंट फ्लॅशला सपोर्ट करतो. ही या फोनची खासियत म्हणता येईल.