शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

Vivo V21 Pro, Vivo Y72 5G, Vivo X70 सीरिज आणि Vivo Smartwatch लवकरच होऊ शकतात भारतात लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2021 6:01 PM

Vivo V21 Pro and Vivo Y72 5G price: Vivo V21 Pro ची किंमत 32,990 रुपयांपासून सुरु होऊ शकते, Vivo Y72 5G चा 8GB रॅम व्हेरिएंट भारतात 22,990 रुपयांमध्ये सादर केला जाऊ शकतो

विवो लवकरच भारतात Vivo V21 Pro आणि Vivo V21 SE स्मार्टफोन 15 जुलैला भारतात लाँच करणार आहे. त्याचबरोबर कंपनी बजेट सेगमेंटमध्ये Vivo Y72 5G आणि फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये Vivo X70 सीरीज लाँच करण्याची तयारी करत आहे. आता 91 Mobiles आणि टिपस्टर योगेश बरार यांनी Vivo V21 Pro आणि Vivo Y72 5G स्मार्टफोनच्या किंमतीची माहिती दिली आहे. तसेच विवोच्या पहिल्या स्मार्टवॉचची माहिती देखील समोर आली आहे.  

Vivo V21 Pro आणि Vivo Y72 5G ची किंमत 

भारतात Vivo V21 Pro ची किंमत 32,990 रुपयांपासून सुरु होऊ शकते, अशी माहिती 91Mobiles च्या रिपोर्टमधून समोर आली आहे. हा स्मार्टफोन या महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. 5G नेटवर्क, 64MP कॅमेरा आणि 33W फास्ट चार्जिंग ही या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये असतील.  

Vivo Y72 5G चा 8GB रॅम व्हेरिएंट भारतात 22,990 रुपयांमध्ये सादर केला जाऊ शकतो. हा विवो स्मार्टफोन 15 जुलै रोजी भारतात MediaTek Dimensity 700 चिपसेट, 64MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो.  

Vivo चा पहिला Smartwatch आणि Vivo X70 सीरिज 

Vivo ने रिटेल पार्टनर्स सोबत मिळून स्मार्टवॉच संबंधित एक सर्वे केल्याची माहिती 91mobile ने दिली आहे. हा सर्वे नवीन स्मार्टवॉच लाँच करण्याच्या नियोजनाचा भाग असू शकतो, असा अंदाज लावला जात आहे. ही बातमी खरी ठरल्यास काही महिन्यातच आपल्या Vivo Smartwatch बाजारात बघायला मिळेल. त्याचबरोबर कंपनी सप्टेंबरमध्ये IPL 2021 दरम्यान भारतात Vivo X70 सीरिज लाँच करू शकते. Vivo X70 सीरिज गेल्यावर्षीच्या Vivo X60 सीरिजची जागा घेईल.  

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड