Vivo ने आज आपल्या ‘वी’ सीरीजमध्ये Vivo V21e 5G लाँच केला आहे. भारतात या फोनची किंमत 24,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन आजसपासूनच ऑनलाईन तसेच ऑफलाईन रिटेल स्टोर्सवर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. Vivo V21e 5G मध्ये 44W FlashCharge टेक्नॉलॉजी, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 64MP रियर कॅमेरा असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.
Vivo V21e 5G चे स्पेसिफिकेशन्स
विवोच्या या नवीन 5जी स्मार्टफोनमध्ये 6.44 इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले मिळत आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 2400 x 1080 पिक्सल आहे. Vivo V21e 5G अँड्रॉइड 11 ओएसवर आधारित फनटच ओएस 11.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये MediaTek Deimensity 700 चिपसेट आणि माली जी57 जीपीयूला देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम +3GB एक्सटेंडेड रॅम देण्यात आला आहे.
विवो वी21ई 5जी मध्ये कंपनीने ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे, त्याला 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाईड अँगल लेन्सची जोड देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा विवो फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Vivo V21e 5G मध्ये 4,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हि बॅटरी 44W Flash Charge टेक्नॉलॉजीने चार्ज करता येईल.