Vivo V23e 5G Phone India Launch: Vivo भारतीय बाजारातील 5G Phone पोर्टफोलियोचा विस्तार करण्याची तयारी करत आहे. जागतिक बाजारात आलेला Vivo V23e 5G देशात लाँच केला जाणार आहे. गेल्या महिन्यात व्हिएतनाममध्ये लाँच झालेला हा फोन लवकरच भारतात सादर केला जाईल, अशी माहिती 91मोबाईल्सनं टिपस्टर योगेश ब्रारच्या हवाल्याने दिली आहे.
Vivo V23e 5G Phone याच महिन्यात अर्थात डिसेंबरमध्ये भारतीय ग्राहकांच्या भेटीला येईल. कंपनीनं मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु योगेशनं विवो या फोन्ससह Vivo V23e Pro देखील सादर होणार असल्याचं सांगितलं आहे. चला जाणून घेऊया जागतिक बाजारात आलेल्या Vivo V23e चे स्पेसिफिकेशन्स.
Vivo V23e 5G Phone चे स्पेसिफिकेशन्स
Vivo V23e 5G मध्ये 6.44 इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले मिळतो. प्रोसेसिंगसाठी यात मीडियाटेक डिमेन्सिटी 810 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. त्याचबरोबर 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते. ही स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. हा डिवाइस अँड्रॉइड 11 आधारित फनटच ओएस 12 वर चालतो. या ड्युअल सिम फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. पॉवर बॅकअपसाठी 4,050एमएएचची बॅटरीला 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.
Vivo V23e 5G मध्ये पॉवर पॅक कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याची सुरुवात 44 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यापासून होते. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते.