Vivo ने गेल्या आठवड्यात आपला स्टायलिश Vivo V23e 4G व्हिएतनाममध्ये लाँच केला होता. आता या फोनच्या 5G व्हेरिएंटची तयारी पूर्ण झाली आहे आणि लवकरच हा नवीन फोन सादर केला जाऊ शकतो. Vivo V23e 5G Phone येत्या 23 नोव्हेंबरला ग्राहकांच्या भेटीला येईल. सर्वप्रथम हा 5G Phone थायलंडमध्ये लाँच केला जाईल, त्यानंतर जगभरात हा फोन उपलब्ध होऊ शकतो.
Vivo V23e 5G Phone 23 नोव्हेंबरला लाँच होणार असल्याची माहिती स्वतः कंपनीने दिली आहे. विवोने शेयर केलेल्या फोटजनुसार हा डिवाइस Black आणि Blue Gradient कलरमध्ये बाजारात येईल. तसेच या Vivo फोनमध्ये 44MP Selfie Camera, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि ओएलईडी डिस्प्ले मिळेल.
Vivo V23e 4G चे स्पेसिफिकेशन्स
Vivo V23e स्मार्टफोन 6.44 इंचाच्या फुल-एचडी अॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या डिवाइसला MediaTek Helio G96 ची पॉवर देण्यात आली आहे. सोबत 8GB RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित फनटच ओएस 12 वर चालतो.
फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP ची अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स आणि 2MP चा सुपर मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडियो कॉलिंगसाठी विवोने 50MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. डिवाइसमधील 4050mAh ची बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.