गेले कित्येक दिवस लीक आणि रिपोर्ट्समधून समोर येणारा Vivo V23e स्मार्टफोन अखेरीस लाँच झाला आहे. हा डिवाइस Vivo V21e चा अपग्रेडेड व्हेरिएंट आहे. सध्या Vivo V23e स्मार्टफोन कंपनीने Vietnam मध्ये लाँच केला आहे. या फोनमध्ये 50MP Selfie Camera, 8GB RAM आणि 44W फास्ट चार्जिंग असे जबराट फिचर देण्यात आले आहेत.
Vivo V23e चे स्पेसीफाकेशन्स
Vivo V23e स्मार्टफोन 6.44 इंचाच्या फुल-एचडी अॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या डिवाइसला MediaTek Helio G96 ची पॉवर देण्यात आली आहे. सोबत 8GB RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित फनटच ओएस 12 वर चालतो.
फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP ची अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स आणि 2MP चा सुपर मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडियो कॉलिंगसाठी विवोने 50MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. डिवाइसमधील 4050mAh ची बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Vivo V23e ची किंमत
व्हिएतनाममध्ये Vivo V23e ची किंमत 8,490,000 VND म्हणजे सुमारे 27,900 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन Moonlight Shadow आणि Sunshine Coast अशा दोन रंगात विकत घेता येईल. हा डिवाइस भारतासह अन्य देशांमध्ये कधी उपलब्ध होईल हे मात्र सध्यातरी सांगता येणार नाही.