शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

विवो व्ही७ दोन हजार रूपयांनी झाला स्वस्त

By शेखर पाटील | Published: January 01, 2018 2:34 PM

विवो कंपनीने आपल्या व्ही७ या मॉडेलच्या मूल्यात २ हजार रूपयांची कपात करण्याचे जाहीर केले आहे.

 विवो कंपनीने आपल्या व्ही७ या मॉडेलच्या मूल्यात २ हजार रूपयांची कपात करण्याचे जाहीर केले आहे. विवो कंपनीने नोव्हेंबर महिन्यात विवो व्ही७ हे मॉडेल १८,९९० रूपये मूल्यात भारतीय ग्राहकांना सादर केले होते. यात आता २ हजार रूपयांची कपात करण्यात आल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. परिणामी हे मॉडेल आता ग्राहकांना १६,९९० रूपयात मिळणार आहे. हा स्मार्टफोन मॅट ब्लॅक आणि शँपेन गोल्ड या रंगाच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन आधी फक्त फ्लिपकार्टवरून मिळत होता. तथापि, आता याला अमेझॉन इंडिया आणि पेटीएम मॉलवरूनही उपलब्ध करण्यात आले आहे. फिचर्सचा विचार केला असता, विवो व्ही ७ या मॉडेलमध्ये ५.७ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस (१४४० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा २.५ डी आयपीएस इनसेल फुल व्ह्यू १९:९ गुणोत्तर असणारा डिस्प्ले असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण आहे. या मॉडेलमध्ये ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४५० हा प्रोसेसर असून याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी आहे. हे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. विवो व्ही ७ या स्मार्टफोनमध्ये एफ/२.० अपार्चर आणि मूनलाईट ग्लो सेल्फी फ्लॅशयुक्त २४ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर याचा मुख्य कॅमेरा एफ/२.० अपार्चर आणि ड्युअल एलईडी फ्लॅशयुक्त १६ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. विवो व्ही ७ हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर आधारित फनटच ओएस ३.२वर चालणारा असेल. तर यातील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स आहेत. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट, डिजीटल कंपास आदी सेन्सर्सदेखील देण्यात आले आहेत.

टॅग्स :Vivoविवो