शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

तब्बल २४ मेगापिक्सल्सच्या फ्रंट कॅमेर्‍याने सज्ज विवो व्ही ७ प्लस !

By शेखर पाटील | Published: September 07, 2017 3:35 PM

विवो कंपनीने २४ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा असणारा विवो व्ही ७ प्लस हा स्मार्टफोन २१,९९० रूपये मूल्यात भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.

ठळक मुद्देअलीकडे काही कंपन्या सेल्फी केंद्रीत स्मार्टफोनला प्राधान्य देत आहेतयात विवो या चिनी कंपनीचे नाव आघाडीवर आहेया अनुषंगाने आज विवो व्ही ७ प्लस हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत दाखल करण्यात आले

विवो कंपनीने २४ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा असणारा विवो व्ही ७ प्लस हा स्मार्टफोन २१,९९० रूपये मूल्यात भारतीय ग्राहकांना सादर केला आहे. अलीकडे काही कंपन्या सेल्फी केंद्रीत स्मार्टफोनला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत असून यात विवो या चिनी कंपनीचे नाव आघाडीवर आहे. या अनुषंगाने आज विवो व्ही ७ प्लस हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत दाखल करण्यात आले. गोल्ड, रोझ गोल्ड आणि मॅट ब्लॅक या रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या या स्मार्टफोनची आजपासून कंपनीच्या संकेतस्थळासह फ्लिपकार्टवरून अगावू नोंदणी सुरू झाली असून ग्राहकांना प्रत्यक्षात हे मॉडेल १५ सप्टेंबरपासून मिळणार आहे.

शीर्षकात नमूद असल्यानुसार विवो व्ही ७ प्लस या मॉडेलची खासियत म्हणजे यात २४ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. हा कॅमेरा एफ/२.० अपार्चरयुक्त असून याला मूनलाईट ग्लो या प्रकारच्या सेल्फी फ्लॅशची सुविधा असेल. अर्थात याच्या मदतीने अतिशय उत्तम सेल्फी घेता येणार असल्याचा विवो कंपनीचा दावा आहे. तर याच्या मागील बाजूस एफ/२.० अपार्चर आणि ड्युअल एलईडी फ्लॅशयुक्त १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल.

उर्वरित फिचर्सचा विचार करता विवो व्ही ७ प्लस या मॉडेलमध्ये ५.९९ इंच आकारमानाचा आणि एचडी (१४४० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा २.५ डी आयपीएस इनसेल फुल व्ह्यू या प्रकारातील डिस्प्ले असेल. हा डिस्प्ले १९:९ अस्पेक्ट रेशोयुक्त असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण असेल. हा डिस्प्ले दिसण्यास अत्यंत आकर्षक असून जवळपास कडा विरहीत या प्रकारातील आहे. विवो व्ही ७ प्लस  हा स्मार्टफोन ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४५० या प्रोसेसरने सज्ज असेल. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. विवो व्ही ७ प्लस हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर आधारित असलेल्या फनटच ओएस ३.२वर चालणारा असेल. तर यातील बॅटरी ३२२५ मिलीअँपिअर क्षमतेची आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट, डिजीटल कंपास आदी सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.  

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान