काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि विवो आपला पहिला स्मार्टवॉच भारतीय बाजारात लाँच करणार आहे. Vivo ब्रँड कथिरीत्या लॅपटॉप सॅगमेंटमध्ये उतरण्याची योजना बनवत आहे. वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन क्लासेसमुळे लॅपटॉप आणि टॅबलेटची मागणी वाढली आहे. या मागणीचा फायदा घेण्यासाठी Realme आणि Redmi सारखे स्मार्टफोन ब्रँड्स लॅपटॉप बाजारात उतरले आहेत आणि यात आता विवोच्या नावाचा देखील समवेश होऊ शकतो.
91mobiles ने टिप्सटर Yogesh Brar च्या हवाल्याने विवो लॅपटॉप सेगमेंटमध्ये येणार असल्याची माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, विवोने एक सर्वे केला आहे, या सर्वेमध्ये कंपनीने युजर्सना लॅपटॉपसाठी कोणता प्राइस बॅंड, डिस्प्ले साइज, प्रोसेसर इत्यादीची विचारणा केली आहे. रिपोर्टनुसार आगामी विवो लॅपटॉप दोन डिस्प्ले साइजसह येऊ शकतो. तसेच, या लॅपटॉपमध्ये 11th जेनरेशन इंटेल कोर आय3 किंवा आय5 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
Vivo Smartwatch देखील होऊ शकतो लाँच
Vivo ने रिटेल पार्टनर्स सोबत मिळून स्मार्टवॉच संबंधित एक सर्वे केला आहे. हा सर्वे नवीन स्मार्टवॉच लाँच करण्याच्या नियोजनाचा भाग असू शकतो, अशी चर्चा आहे. ही बातमी खरी ठरल्यास आगामी काही महिन्यातच आपल्या Vivo Smartwatch बाजारात बघायला मिळेल. त्याचबरोबर कंपनी सप्टेंबरमध्ये IPL 2021 दरम्यान भारतात Vivo X70 सीरिज लाँच करू शकते. Vivo X70 सीरिज गेल्यावर्षीच्या Vivo X60 सीरिजची जागा घेईल.