Vivo सध्या आपल्या सर्वात पावरफुल स्मार्टफोन बाजारात उतरवण्याची तयारी करता आहे. याआधी कंपनी आपल्या विवो नेक्स सीरिजमध्ये फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करत होती. परंतु यावर्षी कंपनी नवीन सीरिजची सुरुवात करू शकते. विवो आपला आगामी प्रीमियम स्मार्टफोन Vivo X Note नावानं बाजारात सादर करू शकते.
Vivo चा एक आगामी स्मार्टफोन चिनी सर्टिफिकेशन साईट 3C वर मॉडेल नंबर V2170A सह दिसला आहे. टिपस्टर WHY LAB नं दिलेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन Vivo X Note नावानं ग्राहकांच्या भेटीला येईल. याआधी हा फोन Vivo NEX 5 नावानं पदार्पण करणार असल्याची बातमी आली होती. 3C लिस्टिंगमधून विवो स्मार्टफोनच्या 80W फास्ट चार्जिंगची माहिती मिळाली आहे.
Vivo X Note चे लीक स्पेसिफिकेशन्स
Vivo X Note स्मार्टफोनमध्ये 7-इंचाचा मोठा Samsung AMOLED E5 डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा एक कर्व एज पंच होल कटआउट असलेला पॅनल असेल. जो Quad HD+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा सर्वात शक्तिशाली Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात येईल. रॅम आणि स्टोरेज देखील साजेशी असेल अशी अपेक्षा आहे.
Vivo X Note स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. ज्यात 50-मेगापिक्सल Samsung S5KGN1 सेन्सर मुख्य कॅमेऱ्याचे काम करेल. तर सोबत 48-मेगापिक्सलची Sony IMX598 लेन्स, 12-मेगापिक्सलचा Sony IMX663 सेन्सर आणि 8-मेगापिक्सलचा OV08A10 टेलीफोटो कॅमेरा 5x झूमसह मिळू शकतो. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळू शकते. विवोचा हा आगामी फ्लॅगशिप फोन मार्चमध्ये जागतिक बाजारात येऊ शकतो.
हे देखील वाचा: