शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

जबरदस्त प्रोसेसरसह Vivo X60 Pro+ लाँच; पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

By जयदीप दाभोळकर | Published: January 22, 2021 4:37 PM

पाहा कोणते आहेत जबरदस्त स्पेसिफिकेशन्स

ठळक मुद्देया स्मार्टफोनच्या मागील बाजूला चार कॅमेरे देण्यात आले आहे.आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल Qualcomm Snapdragon 888 या प्रोसेसरसह हा स्मार्टफोन येतो

स्मार्टफोन तयार करणारी कंपनी विवोनं आपला फ्लॅगशिप मोबाईल Vivo X60 Pro+ लाँच केला आहे. विवोच्या या स्मार्टफोमध्ये आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर, क्वाड रिअर कॅमरा, उत्तम फोटोग्राफीसाठी GN1 आणि Sony IMX598 सेन्सर, 5G कनेक्टिविटी, 55 वॉट फास्ट चार्जिंगसोबतच 4,200mAh बॅटरीसह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आली आहेत. अनेक युझर्स Vivo X60 सीरिजच्या स्मार्टफोनची मोठ्या कालावधीपासून वाट पाहत होते. Classic Orange आणि Phantom Blue या रंगांमध्ये हा स्मार्टफोन बाजारात येणार असून ३० जानेवारीपासून याची विक्री सुरू होणार आहे. 

Vivo X60 Pro+ व्हेरिअंटची किंमतVivo X60 Pro+ हा स्मार्टफोन कंपनीनं दोन व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. यामध्ये 8 GB RAM + 128 GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 4,999 युआन म्हणजेच जवळपास 56,399 रुपये आणि 12 GB RAM + 256 GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 5,998 युआन म्हणजेच जवळपास 67,659 रुपये इतकी आहे. विवोचा हा प्रिमिअम स्मार्टफोन Samsung Galaxy S21 Series smartphone आणि iPhone 12 Series च्या मोबाईलना टक्कर देणार आहे. सध्या हा फोन केवळ चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. गेल्या महिन्यातच विवोनं X60 आणि Vivo X60 Pro लाँच केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा विवोनं हा जबरदस्त स्पेसिफिकेशन्स असलेला फोन लाँच केला आहे.विवोच्या या फ्लॅगशिप Vivo X60 Pro+ या स्मार्टफोनमध्ये 6.56 इंचाचा Full-HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचं स्क्रिन रिझॉल्युशन 2376×1080 पिक्सेल आहे. तसंच या फोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. याव्यतिरिक्त हा फोन OriginOS skin बेस्ड Android 11 सोबत येतो. या फोनमध्ये 4,200mAh ची बॅटरी देण्यात आली असून यासोबत 55W फास्ट वायर्ड चार्जिंग फीचर देण्यात आलं आहे. हा फोन पूर्ण चार्ज होण्यासाठी केवळ ४५ मिनिटं लागत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.Vivo X60 Pro+ मध्ये क्वाड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे. यामध्ये 50MP Samsung GN1 प्रायमरी सेन्सर वापरण्यात आला आहे. याव्यतिरिक्त 48MP Sony IMX598 सेन्सरही देण्यात आला आहे. यासोबतच video image stabilization (VIS) देखील मिळतं. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 2x optical zoom सह 32MP ची टेलिफोटो लेन्स आणि  8MP periscope कॅमेराहीदेण्यात आला असून तो 5x hybrid optical zoom सह येतो.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइलVivoविवोchinaचीन