Vivo ने यावर्षीच्या सुरुवातीला आपली फ्लॅगशिप Vivo X60 सीरीज लाँच केली होती. या सिरीजमध्ये Vivo X60, Vivo X60 Pro, Vivo X60 Pro+ आणि Vivo X60 Curved एडिशन असे स्मार्टफोन्स लाँच केल्यानंतर कंपनीने आता Vivo X60T Pro+ नावाचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. नवीन विवो X60T Pro+ व्हेरिएंट Vivo X60 Pro+ चा डाउनग्रेडेड व्हर्जन आहे, अशी चर्चा आहे. (Vivo X60t Pro+ Goes Official With Snapdragon 888 And 50mp Quad-camera Setup)
Vivo X60T Pro+चे स्पेसिफिकेशन्स
Vivo X60T Pro+ मध्ये 6.56-इंचाचा Full HD+ E3 कर्व अॅमोलेड डिस्प्ले 2376×1080 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या डिस्प्लेमध्ये ऑप्टिकल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि पंच होल नॉच देण्यात आली आहे. Vivo X60T Pro+ मध्ये Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी Adreno 660 GPU देण्यात आला आहे. हा फोन Android 11 आधारित OriginOS 1.0 वर चालतो.
फोटोग्राफीसाठी Vivo X60T Pro+ मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा 50MP चा आहे. तसेच या फोनमध्ये 48MP चा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर, 5X ऑप्टिकल झूमसह 8MP पेरिस्कोप लेन्स आणि 12MP चा पोर्टेट सेन्सर देण्यात आला आहे. Vivo X60T Pro+ मध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4200mAh ची बॅटरी आणि 55W फास्ट चार्ज टेक्नॉलॉजी मिळते.
Vivo X60T Pro+ ची किंमत
Vivo X60T Pro+ कंपनीने दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनचा 8GB + 128GB व्हेरिएंट 4,999 RMB (अंदाजे 57,500 रुपये) तर 12GB + 256GB मॉडेल 5,999 RMB (अंदाजे 69,000 रुपये) मध्ये बाजारात दाखल झाला आहे.