विवोने आपली फ्लॅगशिप Vivo X70 सीरीज काही दिवसांपूर्वी बाजारात उतरवली आहे. परंतु आता कंपनी गेल्यावर्षी लाँच केलेल्या Vivo X60 सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. हा स्मार्टफोन Vivo X60T Pro नावाने सादर केला जाऊ शकतो. हा फोन सर्टिफिकेशन साईट 3C आणि आयएमईआय डेटाबेसवर देखील दिसला आहे. त्यामुळे या फोनच्या लाँचची शक्यता वाढली आहे.
हा आगामी विवो स्मार्टफोन V2120A या मॉडेल नंबरसह काही दिवसांपूर्वी 3C वर दिसला होता. तर IMEI डेटाबेसवरून या फोनचे नाव Vivo X60t Pro असेल असे समजले आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक Dimensity 1200-vivo चिपसेट दिला जाऊ शकतो, अशी माहिती देखील मिळाली आहे. Vivo X60t Pro चे इतर स्पेक्स मोठ्या प्रमाणावर Vivo X60 Pro सारखे असतील. तसेच कंपनी या स्मार्टफोनसह Vivo X60t Pro Plus स्मार्टफोन देखील लाँच करू शकते. याव्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती समोर आली नाही.
Vivo X60t Pro चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Vivo X60t Pro स्मार्टफोनमध्ये 6.56-इंचाचा फुलएचडी+ AMOLED डिस्प्ले दिला जाईल. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह सादर केला जाऊ शकतो. तसेच फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. या मोबाईलच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. ज्यात 48-मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि 13 मेगापिक्सलचे दोन सेन्सर मिळू शकतात. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4,200mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह देण्यात येईल.