शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

विवोचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन लवकरच येणार भारतात; Vivo X70 Pro Plus गुगल प्ले कन्सोलवर लिस्ट 

By सिद्धेश जाधव | Published: September 14, 2021 6:59 PM

Vivo X70 Pro Plus Price In India: चीनमध्ये सादर झालेला Vivo X70 Pro Plus स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होऊ शकतो.  

काही दिवसांपूर्वी विवोने आपली नवीन फ्लॅगशिप Vivo X70 सीरीज चीनमध्ये लाँच केली आहे. या सीरीजमध्ये Vivo X70, Vivo X70 Pro आणि Vivo X70 Pro+ असे तीन पॉवरफुल स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. आता या सीरिजमधील सर्वात मोठा स्मार्टफोन म्हणजे Vivo X70 Pro+ लवकरच भारतात पदार्पण करू शकतो. ही सीरिज याच महिन्यात भारतीयांच्या भेटीला येऊ शकते. Vivo X70 Pro+ स्मार्टफोनचा भारतीय व्हेरिएंट गुगल प्ले कंसोलवर दिसला आहे.  

टिप्स्टर मुकुल शर्माने Vivo X70 Pro+ चा भारतीय व्हेरिएंट गुगल प्ले कंसोलवर स्पॉट केला आहे. या लिस्टिंगमधून या फोनचा मॉडेल नंबर Vivo V2114 आहे, असे समजले आहे. तसेच हा फोन Qualcomm Snapdragon 888+ प्रोसेसरसह सादर केला जाईल. तसेच यात 12GB पर्यंतचा RAM, Android 11, आणि 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले मिळेल, असे समजले आहे. हे स्पेक्स फोनच्या चिनी व्हेरिएंट सारखे आहेत. याआधी आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार विवो एक्स70 सीरिज भारतात आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्या दरम्यान सादर होणार आहे.  

Vivo X70 Pro Plus चे स्पेसिफिकेशन  

Vivo X70 Pro Plus मध्ये 6.78-इंचाचा QHD+ Samsung E5 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 120Hz रिफ्रेश रेटसह येणारा हा फोन कॉर्निग गोरिल्ला ग्लासच्या सुरक्षेसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा लेटेस्ट फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 888 प्लस प्रोसेसर मिळतो. ज्याला Adreno 660 GPU ची जोड देण्यात आली आहे. हा फोन 12GB पर्यंतच्या रॅम आणि 512GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 11 आधारित OriginOS वर चालतो. यातील 4500mAh ची बॅटरी 55W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, ड्युअल बँड Wi-Fi, Bluetooth 5.1, GPS, आणि USB Type-C पोर्ट असे ऑप्शन्स मिळतात.   

Vivo X70 Pro Plus स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा 50MP चा Samsung GN1 सेन्सर आहे. त्याचबरोबर 48MP IMX598 अल्ट्रा वाईड सेन्सर गिम्बल स्टॅबिलायजेशनसह मिळतो. सोबत 12MP डेप्थ सेन्सर आणि 8MP चा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. हे चारही रियर कॅमेरे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनला सपोर्ट करतात, अश्या कॅमेरा सेटअपसह येणारा हा पहिलाच स्मार्टफोन असावा.   

Vivo X70 Pro Plus ची किंमत   

Vivo X70 Pro Plus स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट चीनमध्ये उपलब्ध होतील. यातील 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 5,499 RMB (सुमारे 62,700 रुपये) ठेवण्यात आली आहे. तसेच या फोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 5,999 RMB (सुमारे 68,400 रुपये) आणि 12GB रॅम आणि 512GB व्हेरिएंट 6,999 RMB (सुमारे 79,800 रुपये) ठेवण्यात आली आहे. 

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडIPLआयपीएल २०२१