शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
2
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
3
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
4
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
5
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
6
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
7
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
8
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
9
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
10
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
11
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
12
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
13
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
14
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
15
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
16
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
17
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
18
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
19
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
20
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण

Vivo X70 Pro स्मार्टफोनचे लाँचपूर्वीच शक्तिप्रदर्शन; फ्लॅगशिप प्रोसेसरसह गिकबेंचवर लिस्ट 

By सिद्धेश जाधव | Published: August 09, 2021 5:01 PM

Vivo X70 Pro Specs: Vivo X70 सीरिजमधील Vivo X70 Pro स्मार्टफोन गिकबेंचवर काही स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट करण्यात आला आहे.

ठळक मुद्देVivo X70 सीरिजमधील Vivo X70 Pro स्मार्टफोन गिकबेंचवर काही स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट करण्यात आला आहे.

Vivo ने आज भारतात आपला नवीन मिड रेंज स्मार्टफोन अधिकृतपणे लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Vivo Y53s नावाने बाजारात दाखल झाला असून याची किंमत 19,490 रुपये आहे. पुढल्या महिन्यात आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा सुरु झाल्यावर कंपनी आपला Vivo X70 सीरिज लाँच करू शकते. सप्टेंबरमध्ये Vivo X70, Vivo X70 Pro आणि Vivo X70 Pro Plus हे तीन फ्लॅगशिप स्मार्टफोन्स सादर केले जाऊ शकतात. या स्मार्टफोन्सची कंपनीने अधिकृतपणे माहिती दिली नाही. परंतु Vivo X70 स्मार्टफोन नंतर आता Vivo X70 Pro स्मार्टफोन Geekbench वर लिस्ट झाला आहे.  

Vivo X70 सीरिजमधील Vivo X70 Pro स्मार्टफोन गिकबेंचवर काही स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट करण्यात आला आहे. गिकबेंचनुसार या स्मार्टफोनचा मॉडेल नंबर V2105 आहे. लिस्टिंगमधून या स्मार्टफोनच्या मीडियाटेक प्रोसेसरची माहिती मिळाली आहे. या विवो स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 1200 SoC देण्यात येईल. गीकबेंच रिपोर्टनुसार, या स्मार्टफोनमध्ये 12GB रॅम दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये बाजापेठेनुसार Android 11 आधारित Origin OS किंवा Funtouch OS 11 दिला जाऊ शकतो. Vivo X70 Pro स्मार्टफोनला गीकबेंच सिंगल कोर टेस्टमध्ये 859 स्कोर मिळाला आहे. तर या स्मार्टफोनने मल्टी कोर 2638 पॉईंट्स कमावेल आहेत.  

Vivo X70 संभाव्य स्पेसिफिकेशन्स  

Vivo X70 स्मार्टफोनमध्ये f/1.15 अपर्चरची लेन्स मिळेल, अशी माहिती लीकमधून समोर आली आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 5-अ‍ॅक्सिस इमेज स्टेब्लाइजेशन मिळेल. जर हे खरे ठरले तर विवो एक्स 70 या फीचर्ससह येणारा पहिला स्मार्टफोन असेल. फोनमध्ये Zeiss optics ची ब्रँडिंग मिळू शकते.  

या फोनमध्ये Samsung E4 डिस्प्ले असल्याची देखील माहिती समोर आली आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि FHD+ रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. Vivo X70 स्मार्टफोन पंच होल डिजाइन आणि गोरिल्ला ग्लास 6 प्रोटेक्शनसह बाजारात येऊ शकतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर मिळू शकतो. या डिवाइसमध्ये 4500mAh ची बॅटरी 66W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर केली जाईल. 

Vivo X70 Pro आणि X70 Pro Plus ची भारतातील किंमत   

रिपोर्ट्सनुसार विवो एक्स 70 प्रो स्मार्टफोन 50,000 रुपयांच्या आसपास लाँच केला जाऊ शकतो. तर Vivo X70 Pro Plus ची किंमत 70,000 रुपयांच्या आसपास असेल. Vivo X70 ची किंमत मात्र समोर आली नाही, परंतु हा फोन 50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केला जाऊ शकतो, असे दिसत आहे. 

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड