भारतात विवोने आपल्या वाय सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन नुकतेच सादर केले आहेत. आता Vivo आपल्या होम मार्केट चीनमध्ये आपली आगामी फ्लॅगशिप सीरीज Vivo X70 ची तयारी करत आहे. ही सीरिज आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान भारतात देखील सादर होणार असल्याची चर्चा आहे. आता लाँचपूर्वीच Vivo X70 Pro स्मार्टफोन Google Play Console लिस्टिंगमध्ये दिसला आहे.
Vivo X70 Pro स्मार्टफोन गुगल प्ले कन्सोल लिस्टिंगवर V2105 मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमधून या स्मार्टफोनची इमेज देखील समोर आली आहे. या इमेजनुसार हा विवो फोन पंच होल डिजाईनसह सादर केला जाईल. फोनमध्ये कर्व डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ज्याचा आकार 6.56-इंच इतका असेल. या AMOLED डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080x2376 पिक्सल आणि डेन्सिटी 440ppi पिक्सल इतकी असेल.
Vivo X70 संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Vivo X70 स्मार्टफोनमध्ये f/1.15 अपर्चरची लेन्स मिळेल, अशी माहिती लीकमधून समोर आली आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 5-अॅक्सिस इमेज स्टेब्लाइजेशन मिळेल. जर हे खरे ठरले तर विवो एक्स 70 या फीचर्ससह येणारा पहिला स्मार्टफोन असेल. फोनमध्ये Zeiss optics ची ब्रँडिंग मिळू शकते.
या फोनमध्ये Samsung E4 डिस्प्ले असल्याची देखील माहिती समोर आली आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि FHD+ रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. Vivo X70 स्मार्टफोन पंच होल डिजाइन आणि गोरिल्ला ग्लास 6 प्रोटेक्शनसह बाजारात येऊ शकतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर मिळू शकतो. या डिवाइसमध्ये 4500mAh ची बॅटरी 66W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर केली जाईल.
Vivo X70 Pro आणि X70 Pro Plus ची भारतातील किंमत
रिपोर्ट्सनुसार विवो एक्स 70 प्रो स्मार्टफोन 50,000 रुपयांच्या आसपास लाँच केला जाऊ शकतो. तर Vivo X70 Pro Plus ची किंमत 70,000 रुपयांच्या आसपास असेल. Vivo X70 ची किंमत मात्र समोर आली नाही, परंतु हा फोन 50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केला जाऊ शकतो, असे दिसत आहे.