शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

दमदार कॅमेरा असलेली Vivo X70 Series येणार भारतात; लाँच डेट आली समोर  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 6:54 PM

Vivo X70 Series मध्ये कंपनी Vivo X70, Vivo X70 Pro आणि Vivo X70 Pro Plus असे तीन स्मार्टफोन भारतात सादर करू शकते. 

Vivo ने आपल्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज Vivo X70 च्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे. ही सीरिज भारतात या महिन्याच्या शेवटी म्हणजे 30 सप्टेंबरला सादर केली जाईल. कंपनीने आपल्या ट्विटर अकॉउंटवरून याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर एका मायक्रोसाईटच्या माध्यमातून फोनचे फीचर्स देखील टीज करण्यात आले आहेत. या सीरीजमधील Vivo X70 Pro आणि Vivo X70 Pro+ मॉडेल भारतात येतील अशी माहिती मनीकंट्रोलने दिली आहे.   

Vivo X70 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo X70 Pro स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.56-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आहे. या फोनमध्ये कंपनीने सॅमसंगच्या Exynos 1080 चिपसेटचा वापर केला आहे. या प्रोसेसरला 12GB पर्यंतच्या रॅम आणि 512GB स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. हा फोन Android 11 आधारित OriginOS वर चालतो. अ‍ॅमोलेड डिस्प्ले असल्यामुळे या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.    

Vivo X70 Pro स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा मुख्य कॅमेरा, 12MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 12 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 8 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, ड्युअल-बँड Wi-Fi, Bluetooth 5.1, GPS, आणि USB Type-C पोर्ट असे ऑप्शन्स मिळतात. या विवो फोनमधील 4,450mAh ची बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.    

Vivo X70 Pro Plus चे स्पेसिफिकेशन    

Vivo X70 Pro Plus मध्ये 6.78-इंचाचा QHD+ Samsung E5 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 120Hz रिफ्रेश रेटसह येणारा हा फोन कॉर्निग गोरिल्ला ग्लासच्या सुरक्षेसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा लेटेस्ट फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 888 प्लस प्रोसेसर मिळतो. ज्याला Adreno 660 GPU ची जोड देण्यात आली आहे. हा फोन 12GB पर्यंतच्या रॅम आणि 512GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 11 आधारित OriginOS वर चालतो. यातील 4500mAh ची बॅटरी 55W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, ड्युअल बँड Wi-Fi, Bluetooth 5.1, GPS, आणि USB Type-C पोर्ट असे ऑप्शन्स मिळतात.     

Vivo X70 Pro Plus स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा 50MP चा Samsung GN1 सेन्सर आहे. त्याचबरोबर 48MP IMX598 अल्ट्रा वाईड सेन्सर गिम्बल स्टॅबिलायजेशनसह मिळतो. सोबत 12MP डेप्थ सेन्सर आणि 8MP चा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. हे चारही रियर कॅमेरे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनला सपोर्ट करतात, अश्या कॅमेरा सेटअपसह येणारा हा पहिलाच स्मार्टफोन असावा.  

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड