Vivo आपल्या एक्स सीरिजमध्ये फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करते. हे स्मार्टफोन्स सॅमसंगच्या गॅलेक्सी एस सिरीजला टक्कर देते. आता कंपनी Vivo X80 सीरीजचे स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. लवकरच या सीरिजमधील फोन जागतिक बाजारात येतील आणि भारतात देखील Vivo X80 सीरीज लाँच केली जाईल. या लाईनअपमध्ये Vivo X80 आणि Vivo X80 Pro+ हे मॉडेल लाँच होऊ शकतात.
भारतीय लाँच
विवो एक्स 80 आणि विवो एक्स 80 प्रो+ स्मार्टफोन भारतीय सर्टिफिकेशन साईट बीआयएसवर लिस्ट करण्यात आले आहेत. वॅनिला मॉडेल Vivo V2144 मॉडेल नंबरसह तर प्रो+ मॉडेल Vivo V 2145 नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. गिकबेंचच्या लिस्टिंगवरून देखील या स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.
Vivo X80 सीरीजचे स्पेसिफिकेशन
Vivo X80 सीरीजमध्ये मीडियाटेक डिमेन्सिटी 9000 प्रोसेसर देण्यात येईल. तर Vivo X80 Pro मध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट दिला जाऊ शकतो. प्रो आणि प्रो+ मॉडेल्स 6.78 अॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात येतील. विवो एक्स 80 प्रो+ मध्ये क्यूएचडी+ एलटीपीओ 2 पॅनलचा वापर केला जाईल, तर प्रो मध्ये एफएचडी+ रेजोल्यूशन मिळेल.
विवो एक्स 80 मध्ये 50MP प्रायमरी सेन्सर, 13MP सेन्सर आणि 2X ऑप्टिकल झूम असलेल्या 12MP सेन्सरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. तर विवो एक्स 80 प्रो 50MP + 50MP सेन्सरसह एक क्वॉड-कॅमेरा सेटअपसह असेल, ज्यात 2X ऑप्टिकल झूम असलेला 12MP सेन्सर आणि 5x ऑप्टिकल झूम असलेला 50MP सेन्सर मिळेल. Pro+ मॉडेलमध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा देखील असेल तर Vivo X80 आणि X80 Pro मध्ये 44MP चा फ्रंट कॅमेरा असू शकतो. तसेच Pro आणि Pro+ डिवाइसमध्ये 4700mAh ची बॅटरी असू शकते.