विवोची Vivo X70 सीरीज गेल्या महिन्यात भारतात सादर करण्यात आली होती. ही एक कॅमेरा सेंट्रिक सीरिज आहे. ही सीरिज ग्राहकांपर्यंत पोहोचवल्यानंतर कंपनी आता Vivo X80 सीरीजकडे वळली आहे. समोर आलेल्या रिपोर्टनुसार, विवो लवकरच Vivo X80 सीरिज अंतर्गत स्मार्टफोन सादर करू शकते. मात्र याबाबत कंपनीकडून अधिकृत माहिती येणे बाकी आहे.
Vivo X50 Series पासून कॅमेरा सेंट्रिक स्मार्टफोन सादर करण्याची सुरुवात करण्यात आली होती. ही सीरिज गेल्यावर्षी बाजारात दाखल झाली होती. यावर्षी मात्र कंपनीने Vivo X60 आणि Vivo X70 या दोन सीरीज भारतासह जगभरात उतरवल्या आहेत. अशाच अजून एका कॅमेरा सेंट्रिक सीरिजवर कंपनी काम करत असल्याचे समोर आले आहे.
Vivo X80 संभाव्य फीचर
समोर आलेल्या लीक रिपोर्टमध्ये Vivo X80 च्या डिस्प्ले, चिपसेट, कॅमेरा इत्यादी स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. Vivo X80 सीरीजमध्ये अंडर-डिस्प्ले कॅमेरा सेट-अप मिळू शकतो. हे फिचर सीरिजमधील हायएंड Vivo X80 Pro आणि X80 Pro+ स्मार्टफोनमध्ये मिळू शकते. कंपनी पहिल्यांदाच अंडर-डिस्प्ले सेल्फी कॅमेऱ्याचा वापर करू शकते.
GizChina ने दिल्या माहितीनुसार, Vivo X80 मध्ये 120Hz रिफ्रेश रेट असेलला FHD+ डिस्प्ले मिळेल. हा फोन MediaTek Dimensity 2000 SoC सह बाजारात येऊ शकतो. हा प्रोसेसर 4nm फॅब्रिकेशनवर बनलेला असेल. या फोनमध्ये 50MP चा मेन कॅमेरा मिळेल, जो 5-axis स्टेब्लाइजेशनला सपोर्ट करेल. त्याचबरोबर 2x झूमसह 12MP चा टेलिफोटो कॅमेरा देण्यात येईल.