Vivo X80 Series च्या भारतीय लाँचची घोषणा कंपनीनं केली आहे. या सीरीजमध्ये 18 मेला Vivo X80 आणि Vivo X80 Pro असे दोन स्मार्टफोन भारतात येतील. ही सीरिज कंपनीच्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आली आहे. इथे काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी ही सीरिज जागतिक बाजारात सादर करण्यात आली होती, त्यामुळे या स्पेक्स आधीपासून समजले आहेत.
Vivo X80 चे स्पेसिफिकेशन्स
Vivo X80 मध्ये 6.78-इंचाचा फुलएचडी+ कर्व E5 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 1000 निट्स पीक ब्राईटनेस आणि 100% DCI-P3 कलर गॅमुटला सपोर्ट करतो. हा डिवाइस MediaTek च्या फ्लॅगशिप Dimensity 9000 प्रोसेसरसह येतो.
फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तर मागे ट्रिपल कॅमेरा सेन्सर मिळतो. ज्यात सोनीचा नवीन 50MP IMX866 सेन्सर मुख्य कॅमेऱ्याची जबाबदारी पार पडतो. त्याचबरोबर 12MP ची अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 12MP ची टेलीफोटो लेन्स आहे. फोनमध्ये 4,500mAh बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Vivo X80 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Vivo X80 Pro मध्ये देखील 6.78-इंचाचा डिस्प्ले 2K रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. तसेच हा HDR10+ ला आणि 1500 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करते. या मॉडेलमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट मिळतो. यात 4700mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
कॅमेरा सेगमेंट देखील खास आहे. यात Vivo V1+ ISP आहे आणि त्याचबरोबर मुख्य कॅमेऱ्यासाठी 50MP चा Samsung GNV सेन्सर मिळतो. मागे एक 48MP ची Sony IMX598 अल्ट्रावाईड अँगल लेन्स, 12MP Sony IMX663 टेलीफोटो लेन्स आणि 8MP पेरीस्कोप लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.