Vivo X80 स्मार्टफोन लवकरच ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. हा कंपनीचा टॉप एन्ड स्मार्टफोन असेल, जो लाँचनंतर अॅप्पल आयफोनला टक्कर देईल. आता विवो X80 चे स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत. या लीकमधून या मोबाईलच्या डिस्प्ले, प्रोसेसर आणि डिजाईनची माहिती समोर आली आहे. हा डिवाइस विवो एक्स80 सीरिजमध्ये विवो एक्स80 प्रो आणि विवो एक्स80 प्रो+ सोबत एप्रिलमध्ये सादर केला जाऊ शकतो.
Vivo X80 स्मार्टफोनचे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
प्रसिद्ध टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनच्या पोस्टमधून या फोनची माहिती समोर आली आहे. Vivo X80 स्मार्टफोन पंच होल डिजाईनसह बाजारात येईल. यातील डिस्प्लेचा आकार 6.78 इंचाचा असेल, जो सॅमसंग ई5 अॅमोलेड पॅनल असेल. हा डिस्प्ले फुलएचडी+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह बाजारात येईल. स्मार्टफोनमध्ये डीसी सारखी डिमिंग सुविधा आणि एक्स-अॅक्सिस लीनियर मोटर देण्यात येईल. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 9000 चिपसह बाजारात येईल आणि यात हीट डिसेप्शनसाठी 4000mm चा चौरस चेंबर मिळेल.
आधीचे लिक्स
आधीच्या माहितीनुसार, Vivo X80 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुलएचडी+ एलटीपीओ अॅमोलेड डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात येईल. यात 12GB पर्यंत LPDDR4 रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज मिळू शकते. फोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. ज्यात 50-मेगापिक्सलचा सॅमसंग जीएन5 सेन्सर, 13-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि 12-मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स663 सेन्सर मिळेल. फ्रंटला 44-मेगापिक्सलचा सेल्फी शुटर असेल.